आगामी ३० वषार्ंतील शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्यासाठी नगरपालिकेने माजलगाव धरणातून आणखी एक ३४४ कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव सादर केला आहे. केंद्र सरकारच्या ‘अमृत’  योजनेंतर्गत देण्यात आला आहे. माजलगाव धरणातूनच सध्या सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेला १४ एमएलडी पाण्याची तूट भासत आहे. ती तूट भरून काढण्यासाठी िबदुसरा नदीच्या पात्रातून वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी नदीपात्रात दोन बंधारे बांधण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले.
शहराची २०३० पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून पाच वर्षांपूर्वी माजलगाव धरणातून पाणीपुरवठा योजना करण्यात आली. शहराची लोकसंख्या २ लाख २० हजार झाली असून सध्या दर दिवस ३४ एमएलडी पाणी लागते. त्यातील िबदुसरा प्रकल्पातून १४ तर माजलगाव धरणातून २४ असे ३८ एमएलडी पाणी उचलले जाते. मात्र, सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे िबदुसरा धरणातून पाणी मिळणे बंद झाले आणि माजलगाव धरणातील पातळी कमी झाल्यामुळे आणि पाणी गळती होते. परिणामी दररोज १४ एमएलडी पाण्याची तूट निर्माण झाली आहे. भविष्यात २०५१ पर्यंतची लोकसंख्या, शहराचा विस्तार लक्षात घेऊन नगरपालिकेने आणखी एक माजलगाव बॅक वॉटर योजना राबवण्यासाठी ३४४ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या अटल अमृत योजनेंतर्गत सादर केला आहे. यात प्रामुख्याने १८० किलोमीटरची पाईपलाईन, टाकी व शहरातील जुनी व्यवस्था बदलणे प्रस्तावित आहे. खटकाळीचे वाहून जाणारे चार ते पाच द.ल.घ.मी. पाणी बाराशे मि. मी. व्यासाच्या पाईपद्वारे िबदुसरा धरणात घेण्याची योजना देण्यात आली आहे. धरणाच्या खालील बाजूस जलशुद्धीकरण केंद्र आणि घुमरेवस्ती येथील डोंगरावर २८ एमएलडी क्षमतेची टाकी बांधून शहरातील सर्व टाक्यांमध्ये पाणीपुरवठा करण्याची योजना प्रस्तावित असून यासाठी ३३ कोटी ५५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. केंद्र व राज्य सरकारने या योजनांना मंजुरी दिल्यानंतर शहराच्या पुढील ३० वषार्ंच्या पाणीपुरवठय़ाचा प्रश्न पूर्णपणे निकाली निघणार आहे, असा दावा क्षीरसागर यांनी केला.