X

तरुण मुलाचा खून; आई, मावशी, बहीण कोठडीत

पोलिसांनी आपला खाक्या दाखवून विचारल्यावर त्याने कमलाबाई बनसोडे हिचे अनैतिक संबंध होते.

औरंगाबाद : अनैतिक संबंधास विरोध करणाऱ्या मुलाचा गळा दाबून खून करीत प्रेत विहिरीत टाकून दिलेल्या प्रकरणाचा छडा सिडको पोलिसांनी लावला असून यामध्ये आई, मावशी व मावस बहिणीसह रिक्षाचालकाविरुद्ध बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे. या चौघांनाही गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १३ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली.

आंबेडकरनगरातील  राहुल दिलीप बनसोडे (वय २८) याचा मृतदेह १८ एप्रिल रोजी जाधववाडी परिसरातील विहिरीत सापडला होता. राहुलची आई कमलाबाई दिलीप बनसोडे, मावशी खिरणाबाई जगन्नाथ गायकवाड, मावस बहीण सुनीता राजू साळवे व रिक्षाचालक इंद्रजित हिरामण निकाळजे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. पोलिसांनी रिक्षाचालक इंद्रजित निकाळजे याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी आपला खाक्या दाखवून विचारल्यावर त्याने कमलाबाई बनसोडे हिचे अनैतिक संबंध होते. त्यातूनच त्याची हत्या करण्यात आली होती.

Outbrain

Show comments