बारावीच्या परीक्षेला उद्या (गुरुवार) सुरुवात होणार आहे. विभागातील ५६२ केंद्रांत १ लाख ७४ हजार २७७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा सुरळीत पार पडाव्यात, या साठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने फिरती व बैठी पथके स्थापन करण्यात आली असून महसूल विभागानेही तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली तालुक्याला एक याप्रमाणे पथकांची निर्मिती केली आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ात काही परीक्षा केंद्रे बदलावीत, या साठी राजकीय नेत्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनी दबावास न जुमानता आवश्यकता व सुविधा असणाऱ्या ठिकाणी परीक्षा केंद्र मंजूर केले आहेत. जिल्ह्य़ात २०२ परीक्षा केंद्रे आहेत.
परीक्षेदरम्यान कॉपी होऊ नये, म्हणून विशेष प्रयत्न केले जाणार असून भरारी पथकांच्या नजरेस अनुचित प्रकार आल्यास कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. औरंगाबाद विभागीय मंडळांतर्गत औरंगाबाद, बीड, परभणी, जालना व हिंगोली जिल्ह्य़ांतील परीक्षेचा कारभार सांभाळला जातो. या पाच जिल्ह्य़ांत विज्ञान शाखेत ६१ हजार ५८२, कला शाखेत ६२ हजार ६१६, वाणिज्य शाखेत १२ हजार २९४ विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत. औरंगाबाद जिल्ह्य़ात २०२ केंद्रे असून ६४ हजार ६६८ विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत. त्यात २ हजार ७६१ विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी आहेत. १८ फेब्रुवारी ते २८ मार्चदरम्यान ही परीक्षा होणार असून १ मार्च ते २९ मार्चदरम्यान दहावीची परीक्षा होणार आहे. दहावी इयत्तेसाठी १ लाख ८१ हजार ५७८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
िहगोलीत १० हजार ८५४ परीक्षार्थी
हिंगोली जिल्ह्यात २६ केंद्रांवर १० हजार ८५४ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. जिल्हा प्रशासनाने शिक्षण विभागाची बठक घेऊन परीक्षेत गरप्रकार खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला. जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी जिल्हा दक्षता समितीची बठक घेऊन परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडावी, परीक्षा केंद्रावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना शिक्षण विभागास देऊन परीक्षेत गरप्रकार खपवून न घेण्याचा इशारा दिला होता. जिल्हा शिक्षण विभागाने परीक्षेचे नियोजन केले असून त्या अनुषंगाने माध्यमिक शिक्षणाधिकारी डी. आर. चवणे, उपशिक्षणाधिकारी व्ही. जी. पाटील, शिक्षणाधिकारी गंगाधर जाधव यांच्या उपस्थितीत बठक घेण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12th examination frome today
First published on: 18-02-2016 at 01:20 IST