छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ३ हजार ६७८ शिक्षक बदलीपात्र ठरले असून, यामध्ये १ हजार ४७६ शिक्षक संवर्ग १ चा लाभ घेणार असल्याची माहिती आहे. बदली पोर्टल सोमवारी रात्री १२ च्या सुमारास बंद झाले. प्रशासनाच्या सूचनेनुसार मंगळवार १० रोजी जिल्हाभरातील सर्व पंचायत समित्यांमध्ये संवर्ग एक व दोन साठी अर्ज केलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया सुरू होती. संवर्ग १ आणि २ मधील शिक्षकांच्या कागदपत्र पडताळणीसाठी संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांच्या त्रिस्तरीय समितीने पडताळणी केली.

संवर्ग १ आणि २ मधील शिक्षकांनी ऑनलाइन भरलेले होकार/नकारचे अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिन वरून पडताळणी करण्याची सुविधा १० ते १२ जून पर्यंत चालू राहील. यादी प्रकाशित केल्यानंतर त्यावर इतर शिक्षकांना आक्षेप घेण्याची संधी दिली जाईल.आक्षेप आल्यास त्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत सुनावणी घेऊन निर्णय देत अर्ज स्वीकृत केले किंवा नाकारले जातील, असे सांगण्यात आले आहे. तर सर्व शिक्षकांना समान न्याय आणि संधी मिळणे आवश्यक आहे. बदली प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण झाल्यास शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही याचा फायदा होईल, असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश हिवाळे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आकडेवारी

एकूण बदलीपात्र संख्या – ३ हजार ६७८, विशेष संवर्ग भाग – १ प्राप्त अर्ज – १ हजार ४७६, विशेष संवर्ग भाग – २ प्राप्त अर्ज – ३५५, बदली अधिकार प्राप्त (संवर्ग-३) संख्या – ३२३, बदली पात्र संवर्ग ४ संख्या – १ हजार ५२४.