बेपत्ता युवकाचा जाधववाडीत मृतदेह आढळला; संशयित दोघे ताब्यात

घरातून तीन दिवसापूर्वी अचानकपणे बेपत्ता झालेल्या १६ वर्षीय युवकाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह मंगळवारी  सायंकाळी जाधववाडी परिसरात आढळून आला.

death
प्रतिनिधिक छायाचित्र

औरंगाबाद : घरातून तीन दिवसापूर्वी अचानकपणे बेपत्ता झालेल्या १६ वर्षीय युवकाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह मंगळवारी  सायंकाळी जाधववाडी परिसरात आढळून आला. युसूफ खान असद उल्ला खान (रा. केलासनगर, जिन्सी परिसर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून दोघेही नशेच्या गोळ्या खात असल्याचे जिन्सी पोलिस ठाण्याच्या सुत्रांनी सांगितले.

मृत युसूफ खान हा ११ जून रोजी सकाळी ११ वाजेपासून घरातून बेपत्ता झाला होता. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेवूनही तो मिळाला नाही. त्यानंतर त्याच्या वडिलांनी युसूफ खान याचे अपहरण झाल्याची तक्रार जिन्सी पोलिस ठाण्यात दिली होती. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी जाधववाडी परिसरातील झाडाझूडपातून कुजलेला वास येत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिल्यावर सिडको पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली असता तेथे मृतदेह आढळून आला. दरम्यान, याची माहिती मिळाल्यावर जिन्सी पोलिसांनी घटनास्थळी जावून युसूफ खान याच्या नातेवाईकांना पाचारण केले. त्यांनी मृतदेह युसूफ खान याचा असल्याचे सांगितले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Body missing youth found two suspects are in custody ysh

Next Story
महाराष्ट्रातील धरणांवर परदेशी माशांचा ताबा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी