माथाडी कामगारांचे उपोषण पगाराच्या निर्णयानंतर मागे

वैजापूरच्या शासकीय गोदामातील माथाडी कामगारांचा थकित पगार माथाडी मंडळात जमा करण्याचा निर्णय तहसीलदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेतल्यानंतरच माथाडी कामगारांनी मंगळवारपासून सुरू केलेले सहकुटुंब बेमुदत उपोषण मागे घेतले. मराठवाडा लेबर युनियनतर्फे हे उपोषण करण्यात आले. माथाडी कायद्यानुसार राजकीय गोदामातील माथाडी कामगारांसह सर्वाचा पगार व लेव्ही दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत माथाडी मंडळात भरणे बंधनकारक असताना शासकीय […]

वैजापूरच्या शासकीय गोदामातील माथाडी कामगारांचा थकित पगार माथाडी मंडळात जमा करण्याचा निर्णय तहसीलदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेतल्यानंतरच माथाडी कामगारांनी मंगळवारपासून सुरू केलेले सहकुटुंब बेमुदत उपोषण मागे घेतले. मराठवाडा लेबर युनियनतर्फे हे उपोषण करण्यात आले.

माथाडी कायद्यानुसार राजकीय गोदामातील माथाडी कामगारांसह सर्वाचा पगार व लेव्ही दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत माथाडी मंडळात भरणे बंधनकारक असताना शासकीय गोदामांचे कंत्राटदार पगाराचे वाटप रोखीने करत होते.
रोखीने पगाराचे वाटप करणे हे माथाडी कायद्याचे उल्लंघन असल्याने माथाडी मंडळाने रोखीने पगार घेता कामा नये, असे वैजापूर शासकीय गोदामातील माथाडी कामगारांना सांगितल्यावर त्यांचा दोन महिन्याचा पगार थकला होता, म्हणून बेमुदत उपोषण करावे लागल्याचे मराठवाडा लेबर युनियनचे चिटणीस देवीदास कीर्तीशाह यांनी सांगितले. तहसीलदार डॉ. पडघम यांनी हमाल-कष्टकऱ्यांचे नेते सुभाष लोमटे व कंत्राटदाराची बैठक घेतल्यानंतर माथाडी कामगारांचा पगार व लेव्ही माथाडी मंडळात भरण्यासंबंधी निर्णय झाला व उपोषण मागे घेण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व औरंगाबाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Construction workers stop hunger strike

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या