भाजप विरोधी पक्षाच्याच भूमिकेत, राणेंच्या वक्तव्याशी असहमत ; गिरीश महाजन यांचा दावा

राज्य सरकार असंवेदनशील असल्याची टीका करत महाजन म्हणाले,की राज्यातील पाटबंधारे  विभागांतर्गत एकही काम सुरू नाही

औरंगाबाद : सरकार मार्चपर्यंत पडेल की नाही हे सांगता येणार नाही. पण आता आम्ही विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याचे ठरविले असून सरकार पडेल तेव्हा पडेल, आम्ही काम करू. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री असल्याने त्यांच्या वक्तव्यावर बोलता येणार नाही. हे सरकार पाडण्याचे कोणतेही प्रयत्न सुरू नाहीत, असे गिरीश महाजन यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.  राज्य सरकार असंवेदनशील असल्याची टीका करत महाजन म्हणाले,की राज्यातील पाटबंधारे  विभागांतर्गत एकही काम सुरू नाही. फडणवीस सरकारच्या काळात ९० टक्के कामे पूर्ण झाली होती. पण पाच टक्के काम  पूर्ण होत नसल्याने शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचू शकलेले नाही. वीज वसुली जुलमीपद्धतीने सुरू आहे. सरकार नीट काम करत नाही. पण सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका नीटपणे बजावत असल्याचा दावा त्यांना केला. विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून पुन्हा एकदा दगा झाल्याचा आरोपही त्यांनी केला. चर्चेच्या तीन फेऱ्यांनंतर अनेकांना आम्ही जातीयवादी असल्याचा निष्कर्ष काढावासा वाटतो, हे चुकीचे असल्याचे महाजन म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व औरंगाबाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Disagreeing with narayan rane statement says bjp leader girish mahajan zws

ताज्या बातम्या