छत्रपती संभाजीनगर – कन्नड तालुक्यातील चापानेर येथील बिकेट कंपनीला रविवारी सायंकाळी आग लागली. सुमारे तीन ते चार तासानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.

आग विझवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील पदमपुरा केंद्राकडून एक बंब रवाना करण्यात आला. अधिकारी लक्ष्मण कोल्हे यांचे एक पथक घटनास्थळी पोहेचले होते.

चापानेर गावच्या अलीकडे बिकेट कंपनीला आग लागल्याचे दशरथ सोमने यांनी अग्निशमन नियंत्रण कक्षाला कळविले. सायंकाळी ४.५५ मिनिटांनी धडकलेल्या माहितीनंतर तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मुख्य अग्निशमन दल पदमपुरा पथकाने आग आटोक्यात आणली. बिकेट कंपनी ही भुश्श्याची गट्टू तयार करणारी आहे. या कंपनीतील आगीच्या घटनेत सुमारे ८० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. अग्निशमन विभागाच्या एका वाहनासह कन्नड कारखान्याचे एक पाण्याचे टँकरही होते, असे सांगण्यात आले. आग विझवण्यासाठी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लक्ष्मण कोल्हे यांच्यासह केतन गाडगे, छत्रपती केकान, महेंद्र खोतकर, विजय कोथमिरे, गोपीचंद मोरे, वाहन चालक नंदकिशोर घुगे यांनी परिश्रम केले.