शनिशिंगणापूरमध्ये महिलांनी चौथऱ्यावर जाऊन परिवर्तनाची गुढी उभारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी साडेतीन पीठांपकी अर्धपीठ असलेल्या शहरातील प्राचीन शनिमंदिरात शनिवारी सकाळी महिलांनी प्रवेश करून शनिदेवाला तलाभिषेक केला. याही मंदिरात शनि भीतीच्या आख्यायिकेमुळे महिला प्रवेश करीत नव्हत्या. अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच महिलांनी मंदिर प्रवेश करून ‘अंधश्रद्धेची रुढ’ पद्धत मोडीत काढली. महिलांच्या मंदिर प्रवेशाचे स्वागत करून आता महिलांनी विश्वस्त मंडळात यावे, असे आवाहन मंदिर प्रशासक रामनाथ खोड यांनी केले.
शनििशगणापूर येथील शनिच्या चौथऱ्यावरील महिलांच्या प्रवेशाने गदारोळ उठल्यानंतर न्यायालयानेही मंदिरासाठी िलगभेद असता कामा नये, असे स्पष्ट सुनावले. सरकारनेही महिलांना मंदिर प्रवेश मिळाला पाहिजे, अशी भूमिका घेतल्यानंतर शनि आणि हनुमान मंदिरांतील महिलांच्या प्रवेशाचा विषय ऐरणीवर आला. शहरात साडेतीन पीठांपकी अर्धपीठ असलेल्या शनिमंदिरात दर शनिवारी मोठय़ा संख्येने महिला-पुरुष शनिची वक्रदृष्टी होऊ नये, या साठी दर्शनाला हजेरी लावतात. मात्र, महिला दुरूनच दर्शन घेतात, तर पुरुष शनिच्या मूर्तीवर तेल वाहतात.
प्राचीन काळापासून नाशिक, उज्जन व बीड येथे शनि मंदिराचे साडेतीन पीठ आहे. राजा विक्रमादित्याची आख्यायिका सांगितली जाते. मात्र, त्याही पूर्वीपासून हे मंदिर अस्तित्वात असल्याचे इतिहास संशोधकांचे मत आहे. शनि हा घातक आणि वाईट ग्रह मानला गेल्याने घरातील लक्ष्मी असलेल्या स्त्रीला या शनिपासून दूर ठेवले जाते. शनिवारी मात्र शनिमंदिरात काही महिलांनी जाऊन तलाभिषेक केला. या वेळी त्यांची कोणीही अडवणूक केली नाही. उलट मंदिर प्रशासक रामनाथ खोड यांनी त्यांच्या प्रवेशाचे स्वागत करताना महिलांनी आता मंदिराच्या ट्रस्टवर यावे, असे आवाहन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onबीडBeed
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First time women talabhiseka on shani ardhapith
First published on: 10-04-2016 at 01:10 IST