अलिशान गाड्यातून देशी दारुची तस्करी, १४.१९ लाखाचा मुद्देमाल जप्त

वैजापूर- गंगापूर रस्त्यावर सापळा लावून कारवाई करण्यात आली.

loksatta
इंडिगो कारमधून देशी दारूचे १५ बॉक्स सापडले. तर इनोव्हा कारमधून १७ बॉक्स ताब्यात घेण्यात आले. पहिल्या घटनेत कारसह १ लाख ७७ हजारांचा, तर दुसऱ्या गुन्ह्यात १२ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

औरंगाबादमध्ये अवैध दारू वाहतुकीच्या दोन घटना रात्री उघडकीस आल्या. इंडिगो आणि इनोव्हा कारमधून देशी दारूची तस्करी केली जात होती. वैजापूर विभागाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती मिळाली असता रात्री उशिरा कारवाई करत १४ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
वैजापूर- गंगापूर रस्त्यावर सापळा लावून कारवाई केली असता. इंडिगो कारमधून देशी दारूचे १५ बॉक्स सापडले. तर इनोव्हा कारमधून १७ बॉक्स ताब्यात घेण्यात आले. पहिल्या घटनेत कारसह १ लाख ७७ हजारांचा, तर दुसऱ्या गुन्ह्यात १२ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. औरंगाबाद येथील पदमपुऱ्यातील रहिवाशी असलेल्या घनश्याम बरंडवाल आणि वैजापूर येथील राहुल कुंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Illicit country liquor tranport car seized in aurangabad

ताज्या बातम्या