लातूरचे महापौर अ‍ॅड. दीपक सूळ यांचा त्यांच्या दालनात जाऊन शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख अ‍ॅड. बळवंत जाधव, अभय साळुंके यांनी लवाजम्यासह येऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा देऊन सत्कार केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेत काँग्रेसचे पूर्ण बहुमत आहे. असे असताना काँग्रेसच्या महापौरांचा शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांनी कसा काय सत्कार केला, याची चर्चा महापालिकेच्या आवारात मंगळवारी सुरू होती. संपर्कप्रमुखांसोबत नगरसेविका सुनीता चाळक, विष्णुपंत साठे, सुनील बसपुरे, रवि सुडे आदी नगरसेवकही उपस्थित होते. पक्षीय राजकारण न करता शहराचे हित लक्षात घेऊन महापौरांचा सत्कार केला असल्याचे संजय सावंत यांनी याप्रसंगी सांगितले. महापौर निवडीआधी १५ दिवस अगोदर संजय सावंत यांनी दीपक सूळ यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. काँग्रेसने शिवसेनेचा धसका घेऊन दीपक सूळ यांना महापौरपद देऊ केल्याची चर्चा शिवसेनेने सुरू केली होती. त्या चच्रेला वजन प्राप्त व्हावे, यासाठी शिवसेनेने महापौरांच्या सत्काराची खेळी खेळली असल्याची चर्चाही मंगळवारी सुरू झाली.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latur municipal corporation issue
First published on: 25-05-2016 at 01:47 IST