छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य अध्यक्षपदी माधव बावगे (लातूर) यांची तर कार्याध्यक्षपदी संजय बनसोडे (सांगली) यांची एकमताने निवड झाली. शहादा येथे शनिवारी पार पडलेल्या विस्तारित राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.यासह पाच प्रधान सचिव आणि सात राज्य सरचिटणीस तीन वर्षांत प्रभावी नेतृत्व करणार आहेत. निवड सहमती समिती सदस्य माधव बावगे, सुशीला मुंडे, संजय शेंडे यांनी निवड केली.
राज्य उपाध्यक्षपदी उत्तम कांबळे (नाशिक), डॉ. प्रदीप पाटकर (पनवेल), डॉ. अशोक बेलखोले (किनवट), संतोष आंबेकर (बुलढाणा), संजय शेंडे (नागपूर), डॉ. रश्मी बोरीकर (छत्रपती संभाजीनगर), श्यामराव पाटील (इस्लामपूर) यांची, तर राज्य प्रधान सचिव म्हणून डॉ. ठकसेन गोराणे (नाशिक), विनायक सावळे (शहादा), गजेंद्र सुरकार (वर्धा), रुक्साना मुल्ला (लातूर), विजय परब (मुंबई) यांची निवड झाली आहे.
सरचिटणीसपदांमध्ये आरती नाईक (पनवेल), सुरेश बोरसे (शिरपूर), कृष्णात कोरे (कोल्हापूर), सुधाकर काशीद (सोलापूर), विलास निंबोरकर (गडचिरोली), शहाजी भोसले (छत्रपती संभाजीनगर), उत्तरेश्वर बिराजदार (लातूर) यांचा समावेश आहे. विविध उपक्रमांमधील कार्यकारिणीत अहिल्यानगरच्या रंजना गवांदे आदींचा समावेश असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा कार्याध्यक्ष डी. एन. जाधव यांनी दिली.