औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रमुख व वाणिज्य विभागाच्या अधिष्ठातांच्या नियुक्तीच्या संदर्भाने नियुक्त डॉ. सर्जेराव निमसे समितीच्या चौकशीला राज्यपाल कार्यालयाने स्थगिती दिल्याच्या निर्णयाविरोधात व्यवस्थापन समितीचे काही सदस्य न्यायालयात धाव घेत अ्सून शुक्रवारी या संदर्भातील प्रक्रिया बरीच पुढे सरकली आहे. या वृत्ताला व्यवस्थापन परिषदेतील काही सदस्यांनी दुजोरा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरवदे व परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक योगेश पाटील यांच्या चौकशीसाठी नियुक्त माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या तिघांची नियुक्ती ही बेकायदेशीर असल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने विद्यमान कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या कार्यकाळात डॉ. निमसे समिती नियुक्त करण्यात आली आहे. यापूर्वी उपरोक्त तिघांच्या चौकशीसाठी बोरा समिती नियुक्त करण्यात आली होती. मात्र, डॉ. सूर्यवंशी, डॉ. पाटील व डॉ. सरवदे यांच्या नियुक्तीसंदर्भाने अनुकूल अहवाल बोरा समितीने दिलेला होता. हा अहवाल व्यवस्थापन समितीने फेटाळला. त्यामुळे कुलगुरू डॉ. येवले यांनी डॉ. सर्जेराव निमसे यांची समिती नियुक्त केली. या समितीच्या चौकशीविरोधात डॉ. जयश्री सूर्यवंशी, डॉ. सरवदे व डॉ. योगेश पाटील यांनी राज्यपाल कार्यालयाकडे अपिल दाखल केले.  राज्यपाल कार्यालयाने डॉ. निमसे समितीच्या चौकशीला स्थगिती दिली. त्याला आव्हान देण्यासाठी व्यवस्थापन परिषदेने आमच्या अधिकारावर गदा आणल्यासारखे असल्याच्या मुदयावरून न्यायालयात धाव घेणार आहेत. या संदर्भातील प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाल्याची माहिती असून या वृत्ताला काही सदस्यांनी दुजोरा दिलेला आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Management council court suspension committee ysh
First published on: 29-01-2022 at 00:02 IST