शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पंजाबमधील कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने ही धमकी दिली आहे. ‘दिल्ली में मिल, तुझे AK-४७ से उडा देंगे. सिद्धू मुसेवाला टाइप’, अशा धमकीचा मेसेज संजय राऊतांना आला आहे. या धमकीनंतर संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

यावर मंत्री संदीपान भुमरे यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना भाष्य केलं आहे. संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, असं विचारण्यात आल्यावर संदीपान भुमरे म्हणाले, “संजय राऊतांना मिळालेल्या धमकीबाबत माहिती नाही. पण, नाव चर्चेत राहण्यासाठी ते प्रयत्न करत असतात.”

हेही वाचा : “गृहमंत्रालय झेपत नसेल तर फडणवीसांनी…” सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल, म्हणाल्या, “मी स्वतः अमित शाहांशी बोलणार”

धमकी प्रकरणावरून संजय राऊतांनी शिंदे सरकारवर टीकास्र डागलं आहे. “धमक्या येत असतात. मात्र, विरोधकांना आलेल्या धमक्या सध्याचं सरकार गांभीर्यानं घेत नाही. सगळी सुरक्षा व्यवस्था गद्दार गटाचे आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांसाठी लावली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

हेही वाचा :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मुंबईसह महाराष्ट्रात होणाऱ्या दंगली, महिलांवरील अत्याचार अशा गोष्टी आपण पाहत आहोत. पोलीस अधिकारी वैभव कदम यांनी केलेली आत्महत्या, असं प्रकार रोज घडत आहेत. पण, राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याने त्याकडं पाहण्यास वेळ नाही. आम्हाला आलेल्या धमक्यांची माहिती जेव्हा देतो, तेव्हा गृहमंत्री त्याची चेष्टा करतात की हा स्टंट आहे,” असेही संजय राऊत यांनी म्हटलं.