माकडं आमचे पूर्वज नव्हते, ‘त्यांचे’ असतील: सत्यपाल सिंह

माकडं माणसाचे पूर्वज आहे असं सांगणारे धडे वगळायला हवेत

अखिल भारतीय वैदिक संमेलन

माकडं हे माणसाचे पूर्वज आहेत असं सांगितलं जातं. मात्र वेद शास्त्रात असं कुठेही नाही. आम्ही आता आहोत तसेच होतो असे मत केंद्रीय मानव संसाधन मंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी व्यक्त केले आहे. औरंगाबाद इथं आयोजित अखिल भारतीय वैदिक संमेलन ते बोलत होते. यावेळी त्यांनी वेद शास्त्राचे महत्व अधोरेखित केले. त्याच संदर्भात बोलताना त्यांनी माकडं हे माणासचे पूर्वज नसल्याचा दावा केला.

ज्या शिक्षकांचे पूर्वज माकडं आहेत ते मानवाचे माकड पूर्वज आहेत असं शिकवत असतील असेही सत्यापल सिंह म्हणाले. आणि असा अभ्यासक्रम शिकवणाऱ्या शिक्षकांचेच पूर्वज माकड असतील आमचे नाही’ असं म्हणत त्यांनी मानवी उतक्रांतीचा डार्विनचा सिद्धांत नाकारला.

केवळ शिक्षकांवर टिका करून न थांबता माकडं हे माणसाचे पूर्वज आहेत असं सांगणारे पाठयपुस्तकातील धडे वगळायला हवेत असं मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. जी माणसं इतिहास शोधतात ते आपल्या परंपरेला खाली आणतात. योगाचा इतिहास नाही. त्यामुळे तो शोधू नये जेव्हापासून जगाची निर्मिती झाली तेव्हापासून ज्ञानाच्या रुपात आपल्याला वेद मिळाल्याचा दावा त्यांनी केला. वेद सिद्ध करण्यासाठी कोणत्या पुस्तकाची गरज नसल्याचं ते म्हणाले. वेद सर्वश्रेष्ठ असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Monkeys are not our ancestors says satyapal singh

ताज्या बातम्या