छत्रपती संभाजीनगर – वाळूजमधील साजापूर येथील लघु उद्योजक सचिन साहेबराव नरोडे (वय ३७) यांचा बंदुकीची गोळी झाडून केलेल्या खून प्रकरणात लाच प्रकरणात निलंबित असलेला पोलीस अंमलदार रामेश्वर सीताराम काळे व त्याचा साथीदार लक्ष्मण नामदेव जगताप यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी शुक्रवारी दुपारी येथे आयोजित पत्रकार बैठकीत दिली. अनैतिक संबंधाच्या कारणातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचेही बगाटे यांनी सांगितले.

हेही वाचा – बच्‍चू कडू यांच्या खेळीने महायुतीसाठी डोकेदुखी वाढणार ?

हेही वाचा – लिंगायत मतपेढीचे गणित मांडत लातूरमध्ये काँग्रेसची डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी

हेही वाचा – सांगलीच्या आखाड्यात पैलवान उतरल्याने भाजप आणि काँग्रेसची समीकरणे बदलली

याप्रकरणी १८ मार्च रोजी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात निवृत्त शिक्षक साहेबराव फकीरराव नरोडे यांनी फिर्याद दिली होती. १७ मार्च रोजी रात्री सचिन नरोडे यांचा बालाजी नगरमधील राहत्या घराजवळ गोळी झाडून खून करण्यात आला होता. खुनाच्या तपासासाठी पोलिसांची गुन्हे शाखेतील पाच पथके व एमआयडीसी वाळूज पोलिसांची तीन, अशी मिळून आठ पथके स्थापन करण्यात आली होती. पाच दिवसांनंतर खुनाची नेमकी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. पत्रकार बैठकीला पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत स्वामी, सहायक आयुक्त महेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, कृष्णचंद्र शिंदे आदी उपस्थित होते.