सुहास सरदेशमुख

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या पाच टप्प्यांतील मतदानामुळे हेलिकॉप्टर सेवा पुरविणाऱ्या खासगी कंपन्यांना काहीशी उसंत मिळत असली, तर प्रचारादरम्यान हेलिकॉप्टरची कमतरताही जाणवत असल्याचे सांगण्यात येत आहे. देशभरात उपलब्ध असणाऱ्या दीडशे हेलिकॉप्टरपैकी बहुतांश उड्डाणे हे समुद्रातील इंधन कंपन्यांमध्ये होते. त्यामुळे या वेळी निवडणुकांसाठी ७० ते ८० हेलिकॉप्टरच उपलब्ध आहेत. 

Beer companies face dry day due to water shortage
पाणीटंचाईमुळे बिअर कंपन्यांवर ‘ड्राय डे’चे सावट
prakash ambedkar pratik patil vishal patil
सांगलीचं गणित बिघडणार? प्रकाश आंबेडकर मैदानात; प्रतीक पाटलांच्या भेटीनंतर मोठं वक्तव्य, म्हणाले, “विशाल पाटील जर…”
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
ajit pawar warns his siblings
“गप्प बसतोय म्हणून वळवळ करु नका”, अजित पवार यांचे भावंडांना प्रत्युत्तर

या वेळी उन्हाची काहिली अधिक असल्याने हेलिकॉप्टरच्या एकूण क्षमतेचा परिपूर्ण वापर हे कामही हेलिकॉप्टर कंपन्यांसमोर आव्हानात्मक बनले आहे. कमी वेळात दुपारच्या सभा घेण्यासाठी ठिकठिकाणी उभारण्यात येणाऱ्या तळांचे एक वेळचे भाडे पाच हजार रुपये ठरविण्यात आलेले आहे. हवाई उड्डाण क्षेत्रात काम करणारे ‘मॅब एव्हिएशन’चे मंदार भारदे म्हणाले, की या वेळी पाच टप्प्यांत मतदान होणार असल्याने तसे ७०-७५ दिवस प्रचारासाठी   मिळतात. त्यामुळे हवाई क्षेत्रात हेलिकॉप्टर सेवा पुरविणाऱ्यांना काहीशी उसंत मिळत असली, तरी हेलिकॉप्टरची संख्या मात्र तशी कमीच आहे. ही सेवा मुख्यत: तेल कंपन्यांसाठी, तसेच समुद्रातील वाहतुकीसाठी वापरली जाते. पवनहंससारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना हेलिकॉप्टर सेवा देण्याच्या अनेक मर्यादा आहेत. तालुक्याच्या पातळीवर किंवा विमानतळ नसणाऱ्या जिल्ह्यात हेलिकॉप्टरसाठी तळ उभा करणे हे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सहकार्याने केले जाते. अक्षांश आणि रेखांश कळविल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून हेलिकॉप्टर उतरविण्याची परवानगी घ्यावी लागते. ती परवानगी घेतल्यानंतर निवडणूक उमेदवाराच्या प्रचारात प्रत्येक उड्डाणासाठी पाच हजार रुपयांचे शुल्क आकारण्याचा निर्णय छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे.

हेही वाचा >>>पाणीटंचाईमुळे बिअर कंपन्यांवर ‘ड्राय डे’चे सावट

छत्रपती संभाजीनगर येथील  ‘निर्मिक एव्हिएशन’चे सुबोध जाधव म्हणाले, की देशभरातील हेलिकॉप्टर सेवांमध्ये महाराष्ट्रातून भाजपच्या नेत्यांची अधिक मागणी आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, तसेच विविध पक्षांच्या स्टार प्रचारकांसाठी हेलिकॉप्टरची पूर्वनोंदणी तशी वर्ष-दीड वर्षांपूर्वी झालेली होती. या वेळी हेलिकॉप्टर सेवा पुरविताना उन्हाचा तडाखा हे आव्हान असणार आहे.

हेलिकॉप्टरचे दर साधारणत: दोन प्रकारांत असतात. आरामदायी आणि वजन वाहून नेण्याच्या क्षमतेनुसार प्रतितास ४.५ ते ६.५० लाख रुपयांपर्यंत भाडे आकारले जाते.  लघुशक्तीचे छोटे हेलिकॉप्टर असेल, तर त्याचे दर अडीच ते तीन लाख रुपये असतात. दिवसभरात फार तर तीन तास एवढीच उड्डाणे केली जातात. साधारण या क्षेत्रात ११२ कंपन्या आहेत. सहा ते सात अति महत्त्वाच्या व्यक्तींचा हवाई प्रवास असेल, तर चार्टर विमान घेतले जाते; पण निवडणुकीमध्ये हेलिकॉप्टरची मागणी अधिक असते. एवढी, की त्यांची संख्या कमी पडते. – सुबोध जाधव,  निर्मिक एव्हिएशन, छत्रपती संभाजीनगर

बहुतांश हेलिकॉप्टर युरोपीय बनावटीची आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठीचे तापमान हे जास्तीत जास्त ३० अंश सेल्सिअस गृहीत धरलेले असते. मराठवाडय़ात आणि विदर्भातील सरासरी तापमान सध्या ४० अंशांच्या पुढे आहे. त्यामुळे ज्या भागात प्रचारासाठी हेलिकॉप्टर ठेवायचे आहेत, तिथे आधी इंधन पोहचवावे लागते. धूळ उडू नये म्हणून तळावर टाकलेले पाणीसुद्धा काही मिनिटांत सुकून जाते. त्यामुळेच हेलिकॉप्टरच्या संपूर्ण क्षमतेच्या वापराला मर्यादा आहेत. – मंदार भारदे, मॅब एव्हिएशन