|| बिपीन देशपांडे

वैद्यकीय शिक्षणासाठी पोलंडकडून प्रस्ताव

Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…

औरंगाबाद : युक्रेन-रशियातील युद्धभयाच्या सावटातून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांपुढे अर्धवट सुटलेले वैद्यकीय शिक्षण कसे आणि कुठे घ्यायचे, असा प्रश्न असून त्यांच्यासमोर आता पोलंडकडून प्रस्ताव समोर ठेवण्यात आला आहे. युक्रेनमधील शिक्षणाएवढेच शुल्क आकारून वैद्यकीय शिक्षण देण्याची तयारी पोलंडने दर्शवली असल्याची माहिती युद्धभूमीतून परतलेल्या विद्यार्थ्यांकडून मिळाली. अन्य देशातील प्रस्ताव समोर येत असताना राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाकडून अद्यापि अभ्यासच सुरू असल्याचे सांगण्यात येते.

युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणाचा एकूण कालावधी ५ वर्षे ८ महिने आहे. या कालावधीसाठी तेथील विद्यापीठांकडून ४ हजार ९०० डॉलर, तर वसतिगृह व जेवणासाठी ७८० डॉलर आकारले जातात. भारतीय रुपयांमध्ये शिक्षणासाठी १८ लाख शुल्काचा, तर इतर सर्व म्हणजे अगदी विमानाने भारतातून येण्या-जाण्यापर्यंतच्या तिकिटासह ३० लाख रुपये खर्च येतो. यातून संपूर्ण वैद्यकीय शिक्षण पूर्ण होते आणि युक्रेनमधील वैद्यकीय पदवीला सर्वत्र मान्यताही आहे. मात्र, युक्रेन-रशियात पेटलेल्या युद्धामुळे भारतीय विद्यार्थ्यांना मायभूमीत परतावे लागत आहे. त्यांच्यापुढे पुढील वैद्यकीय शिक्षणाचा पेच निर्माण झाला असून त्याबाबतची चाचपणी आता विद्यार्थी करत आहेत. त्यामध्ये पोलंडकडून वैद्यकीय शिक्षणासाठी प्रस्ताव पुढे आला असून शिक्षण पूर्ण होताच अर्धवेळ नोकरीचीही हमी देण्यात येत आहे. मात्र पोलंडने पुन्हा पहिल्यापासून प्रवेशाची अट पुढे केली आहे. अनेक विद्यार्थ्यांना ही अट न पटणारी असली तरी वैद्यकीय शिक्षणातील भवितव्याचा विचार करूनच त्याचा स्वीकार करायचा किंवा नाही, अशी द्विधा मनस्थिती झाली आहे. कुटुंबीयांचा विचार आणि आर्थिक परिस्थिती पाहून विद्यार्थी त्यांच्या पातळीवर पोलंडमध्ये शिक्षण घ्यायचे किंवा नाही, याचा विचार करतील. अनेकांची पुन्हा पैशांची जुळवाजुळव करण्यासारखी परिस्थिती नाही.

अनेक जण सरकारकडून काही मार्ग काढला जातो का, याकडे डोळे लावून आहेत, असे युक्रेनमधून औरंगाबादेत परतलेल्या भूमिका रोहिदास शार्दूलने सांगितले. युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षणाची पद्धतही खूपच चांगली असल्याचे मत भूमिकाने मांडले. 

थंडीत ७० ते ८० किमी पायपीट

भूमिका व तिची औरंगाबादेतीलच मैत्रीण श्रुतिका चव्हाण या दोघीही गुरुवारी रात्री येथे परतल्या. दोघीही डानेलो हालॅत्स्की लिविव नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीत वैद्यकीय शिक्षण घेत होत्या. भूमिकाने २१ महिन्यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. युक्रेनमध्ये असताना तिने ‘लोकसत्ता’शी संवाद साधला होता. तेथपासूनच्या परतेपर्यंतचा सर्व घटनाक्रम कथन करताना भूमिका म्हणाली, ७ अंश तापमानात आम्ही ७० ते ८० किलोमीटर २५ ते ३० किलो वजन पाठीवर घेऊन चाललो. युद्धाचा शंखनाद (सायरन) व्हायचा तेव्हा मात्र जीव मुठीत घेऊन आम्ही दूपर्यंत पळायचो. दिवसभरात सहा-सहावेळा शंखनाद व्हायचा. जेवणाचेही हाल झाले. अखेर १५ दिवसांचे किराणा सामान आणून जेवणाची व्यवस्था केली. पण भय मनात कायम होतेच. या उलट तेथील स्थानिकांचे. त्यांना युद्धाविषयी फारसे काही वाटत नव्हते. त्यांच्यासाठी ते एक अटळ सत्य त्यांनी स्वीकारले होते. आम्ही मात्र अनेक दिवस भयाच्या सावटाखाली घालवले, अशी आपबिती भूमिकाने मांडली.