राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचा रौद्रवतार पक्षाच्या कार्यकर्त्यांना बघायला मिळाला. निमित्त पैठण येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्याचं. राष्ट्रवादीचे संजय वाघचौरे आणि दत्ता गोर्डे यांच्या समर्थकांमधील वाद उफाळून आला. सुप्रिया सुळे यांच्यासमोरच हा वाद झाला. कार्यकर्त्यांमधील वाद बघून संतापलेल्या सुप्रिया सुळे यांनी कार्यक्रमामध्येच राडेबाज कार्यकर्त्यांना दम दिला. “माझ्या बापानं रक्ताचं पाणी करून पक्ष उभा केला आहे. त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, तर गाठ माझ्याशी आहे,” असा दम सुळे यांनी कार्यक्रर्त्यांना दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पैठण येथे कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळव्यात पक्षाचे दत्ता गोर्डे आणि संजय वाघचौरे यांच्या समर्थकांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा मुद्दा उपस्थित करत गोंधळ घातला. हा सगळा गोंधळ सुप्रिया यांच्यासमोरच झाला.

तालुक्यातील विकासाच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना विधानसभा निवडणुकीतील विषय मांडण्यात आला. वाघचौरेंनी मदत केली असती, तर गोर्डेंना एक लाख मतं मिळाली असती, असं गोर्डे समर्थक म्हणाले. त्यावर सुळे यांनी ही बैठक तालुक्यातील विकासाकामांच्या संदर्भात असल्याचं सांगितलं. त्यानंतरही हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आणि दोन्ही गटात राडा झाला.

हे संतापलेल्या सुप्रिया सुळे यांनी माईकचा ताबा घेतला. आता फक्त मी बोलणार, असं सांगितलं. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले. “राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष माझ्या वडिलांनी रक्ताचं पाणी करून कष्टानं उभा केला आहे. याचं भान कार्यकर्त्यांनी ठेवावं. तुमचा मान, आदर मी करतेच. तुमच्या भावनाही समजू शकते. पण, गालबोट लावणाऱ्याला मी माफ करणार नाही. मी कुठल्या बापाची लेक आहे, तुमच्या लक्षात आहे. गाठ माझ्याशी आहे. माझ्या बैठकीत पहिल्यांदा असा गोंधळ झाला आहे. ही बैठक माझ्यासाठी आठवणीत राहिलं,” असा दम देत त्यांनी अर्ध्यावरच हा कार्यकर्ता मेळावा संपल्यांची घोषणा केली आणि त्या निघून गेल्या.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule angry on party activist bmh
First published on: 21-02-2020 at 17:35 IST