scorecardresearch

Premium

उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक

खजाना बावडीजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीला ताफ्यातील एका गाडीने जोराची धडक दिली.

Chhote Maharaj , yogi adityanath , UP CM , Running UP government is not simple as running mascot , Narendra Modi, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
Shivsena : शिवसेनेने योगी आदित्यनाथ यांच्या भूमिपुत्रांना रोजगारासाठी प्राधान्य देण्याच्या भूमिकेचीही कौतूक केले आहे. योगी आदित्यनाथ यांचा हा निर्णय हा शिवसेनेच्याच विचारांचा विजय आहे.

पिता-पुत्र जखमी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीने समोरून भरधाव आलेल्या दुचाकीला धडक दिल्याने पिता-पुत्र गंभीर जखमी झाले. अपघात होताच पोलिसांनी तत्काळ चौसाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. बीडजवळील खजाना बावडी येथे बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला.

chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
canada prime minister justin trudeau (1)
कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!
rahul narvekar supreme court uddhav thackeray eknath shinde
सत्तासंघर्षाबाबत मोठी अपडेट; राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना, संजय शिरसाटांनी सांगितलं कारण, म्हणाले…

जिल्ह्य़ातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी ठाकरे यांचे उस्मानाबादहून सायंकाळी पाचच्या सुमारास चौसाळा येथे आगमन झाले. काही शेतकऱ्यांशी चर्चा करून ठाकरे यांच्यासोबतच्या ५० गाडय़ांचा ताफा बीडकडे येत होता. खजाना बावडीजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीला ताफ्यातील एका गाडीने जोराची धडक दिली. यात दिलीप वाघ (वय ४०) व त्यांचा मुलगा शुभम (वय १२, खडकीघाट) गंभीर जखमी झाले.

पोलिसांनी तत्काळ ताफा थांबवून ताफ्यातील चौसाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सायंकाळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-05-2016 at 01:29 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×