मारुती कंपनी उद्या बाजारात त्यांची नवीन बलेनो कार लॉंच करणार आहे आणि यावेळी कंपनी कारसोबत भरपूर हायटेक फीचर्स देखील देणार आहे. यातील काही फीचर्स अगदी नवीन असतील आणि सेगमेंटमध्ये प्रथमच कारसाठी उपलब्ध होणार आहेत. अलीकडेच कंपनीने माहिती दिली आहे की नवीन बलेनो ३६० डिग्री कॅमेरासह येईल, हे वैशिष्ट्य केवळ कार पार्क करण्यातच मदत करत नाही तर ड्रायव्हरला ब्लाइंड स्पॉट्समध्ये देखील मदत करेल. तसेच कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकी नवीन बलेनोसोबत कनेक्टेड कार तंत्रज्ञान देईल, जी कारच्या अनेक वैशिष्ट्यांना इंटरनेटशी जोडली जाणार आहे.

२३ फेब्रुवारीला मारुती कंपनी लॉंच करणार २०२२ बलेनो

मारुती सुझुकीचे सेल्स आणि मार्केटिंग कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले की, २३ फेब्रुवारीला कंपनी भारतात २०२२ बलेनो लॉंच करेल. तसेच त्यांनी यावेळी सांगितले की, कारमध्ये केवळ कॉस्मेटिक बदल केले गेले नाहीत तर येथे कनेक्टिव्हिटी, सुविधा, पॉवरट्रेन आणि डिझाइनमध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर व्हॅल्यू फॉर मनी अशी कार असेल आणि त्यात ग्राहकांना कारमध्ये आवश्यक असलेली सर्व फीचर्स देण्यात आले आहे. यातील काही फीचर्स या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच दिले जात आहेत, याशिवाय ही कार इतर अनेक फीचर्ससह उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
global capital market, samir arora, mutual fund, samir arora journey in market, samir arora and global market journey, samir arora work, helios mutual fund, alliance capital management, asset management comapanies, hdfc limited, hdfc bank, samir arora thoughts in hdfc merge,
बाजारातील माणसं : जागतिक भांडवल बाजारातील अनुभवी खेळाडू : समीर अरोरा
entrepreneur and digital freelancer Saheli Chatterjee
सोशल मीडियावर ११० रुपयांनी सुरू झाली कमाई; आता आहे कोट्यावधींची मालकीण! जाणून घ्या ‘या’ उद्योजिकेचा प्रवास
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात

कारचे सराऊंड सेन्स फीचर

मारुती सुझुकीने २०२२ बलेनोला हेड्स अप डिस्प्ले स्क्रीन देखील दिली आहे, जी सेगमेंटमध्ये प्रथमच दिली जात आहे. याशिवाय नवीन प्रीमियम हॅचबॅक अद्ययावत ९-इंच एचडी स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह येईल. कंपनी या कारला सराऊंड सेन्स फीचर देखील देणार आहे जे आर्किम्स वरून चालते, दावा करत आहे की केबिनमध्ये बसलेल्या लोकांना ते ध्वनिक आवाज देते. २०२२ मॉडेलला नवीन पिढीचे मारुती सुझुकी कनेक्टेड तंत्रज्ञान दिले जाईल, जे वापरकर्त्यांना ४० पेक्षा जास्त कनेक्टेड कार फीचर्स देईल. त्याच बरोबर कारच्या ९-इंचाच्या स्मार्टप्ले प्रो सिस्टीमला हाय मारुती अशी कमांड देऊन तुमच्या व्हॉइसद्वारे अनेक फीचर्स ऍक्सेस करता येतील.

मॉडेल इंजिन

सध्याच्या मॉडेलचे इंजिन हे २०२२ मारुती सुझुकी बलेनोसोबत दिले जाईल असा अंदाज आहे. अशा परिस्थितीत नवीन कार पूर्वीप्रमाणेच १.२-लीटर पेट्रोल इंजिनसह येईल, जी ५-स्पीड मॅन्युअल आणि ४-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांमध्ये येते. मात्र, नवीन मॉडेलनुसार या इंजिनची शक्ती काहीशी वाढवता येऊ शकते. याशिवाय कारचे मायलेजही वाढण्याचा अंदाज आहे. नवीन कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध केली जाईल आणि कंपनीचा दावा आहे की हे दोन्ही मॉडेल एक लिटर पेट्रोलमध्ये अनुक्रमे २२.३५ आणि २२.९४ किमी मायलेज देतात.

२०२२ बलेनोसाठी बुकिंग सुरू

नवीन मारुती सुझुकी बलेनो लाँच होण्यापूर्वीच सर्वत्र प्रसिद्ध होत असल्याचे पाहतोय. त्यात बलेनोच्या २०२२ मॉडेलला देखील १६,००० बुकिंग मिळत आहे. बलेनो प्रीमियम हॅचबॅकचा कंपनीच्या विक्रीत मोठा वाटा आहे आणि २०१५ मध्ये लॉंच झाल्यापासून कंपनीने आतापर्यंत या कारच्या १ दशलक्षाहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे. मारुतीने २०२२ मॉडेल बलेनोसाठी बुकिंग सुरू केले आहे आणि ग्राहक ११,००० रुपये टोकन देऊन ते बुक करू शकतात. दरम्यान ही कर बाजारात Tata Altroz, Hyundai i20 आणि Honda Jazz शी स्पर्धा करेल. याशिवाय ६ ते ९ लाख रुपयांच्या श्रेणीत असलेली निसान मॅग्नाइट आणि रेनॉल्ट किगर सारख्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही या कार देखील या स्पर्धेत आहेत.