सध्या देशामध्ये EV कारचे प्रमाण हळू हळू वाढताना दिसत आहे. लोकांचा कल हळू हळू EV गाड्यांकडे वळताना दिसत आहे. अनेक कंपन्यांनी EV वाहनांची अनेक मॉडेल्स भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केली आहेत. Kia कंपनीने आपली इलेट्रीक कार EV 6 ची वाढती मागणी बघून याचे बुकिंग पुन्हा सुरु केले आहे. ज्यामुळे नवीन ग्राहक या गाडीचे बुकिंग करू शकणार आहेत. NCAP मध्ये ५ -स्टार रेटिंग मिळालेल्या Kia ला या कारचे फक्त १०० युनिट्सची विक्री करायची होती. परंतु कंपनीला आधीच ४३२ युनिट्सचे बुकिंग मिळाले आहे.

Kia EV 6 चे डिझाईन

किआ कंपनीने ही कार ई-जीएमपी प्लॅटफॉर्मवर बनवली आहे, जी केवळ इलेक्ट्रिक वाहनांसाठी बनवली आहे. यात डिजिटल टायगरच्या चेहऱ्यासह मस्क्यूलर बोनेट देण्यात आले आहे. याशिवाय स्लीक ग्रिल, डीआरएलसह एलईडी हेडलाइट्स आणि रॅक केलेले विंडशील्ड, तर कारच्या बाजूला ब्लॅक-आउट पिलर, इंडिकेटर-माउंटेड ORVM सह १९ -इंच अलॉय व्हील देखील आहेत. ही इलेक्ट्रिक कार Moonscape, Snow White Pearl, Runway Red, Aurora Black Pearl आणि Yacht Blue या पाच रंगांमध्ये बुक करता येणार आहे.

man lose over rs 20 lakhs in fake stock market trading scams
शेअर ट्रेडींगमध्ये अधिकचा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेबावीस लाखांची फसवणूक
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम
public sector enterprises disinvestment in fy 24
निर्गुंतवणूक लक्ष्याची सरकारला पुन्हा हुलकावणी! सरकारी मालकीच्या कंपन्यांमधील हिस्सा विक्रीतून १६,५०७ कोटींचा लाभ

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 16 April: ‘या’ शहरात पेट्रोल-डिझेल महागलं, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

किआ इंडियाचे एमडी आणि सीईओ ताई-जिन पार्क म्हणाले की, या वर्षासाठी कंपनी विस्तारावर अधिक लक्ष केंद्रित करेल. गेल्या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये कंपनीने ४३२ युनिट्सची विक्री केली होती. सध्याच्या १५ डिलरशिपसह सर्व ६० आउटलेपर्यंत १५० kw हाय-स्पीड चार्जर नेटवर्कचा विस्तार करण्याची योजना आखत आहे.

२०२२ मध्ये कंपनीने EV6 लॉन्च केले. या आधी २६ मे पासून याचे बुकिंग १३ शहरांमधील १५ डिलर्सकडे झाले होते. यामध्ये दिल्ली, मुंबई, पुणे, अहमदाबाद, गुरुग्राम, नोएडा, जयपूर, चेन्नई, बंगळुरू, कोची, हैदराबाद आणि कोलकाता यांचा समावेश आहे. किआ इंडियाच्या EV २ गाडी ५.२ सेकंदात ०-१०० किमीचा स्पीड पकडते. यामध्ये कंपनीने फास्ट डीसी चार्जिंग, वाहन-टू-लोड (V2L), १४ स्पीकर मेरिडियन साउंड सिस्टम, ADAS, कनेक्टेड कार टेक, एक कर्व्ह डिजिटल कन्सोलसह अनेक फीचर्स दिले आहेत. तसेच कंपनीने या गाडीमध्ये सिंगल PMS इलेक्ट्रिक मोटर दिली आहे. जे २२६ बीएचपी आणि ३५० NM ट्रॅक जनरेट करते. हे पॉवर जीटी लाईनसाठी आहे. GT लाइन AWD ला ड्युअल इलेक्ट्रिक मोटर मिळते जी ३२० बीएचपी आणि ६०५ nm टॉर्क जनरेट करते.

Kia EV 6 चे फीचर्स

या कारंधील फीचरसबद्दल बोलायचे झाल्यास तर त्यामध्ये १२.३ इंचाचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऍडजेस्टेबल सीट, Apple कारप्ले, अँड्रॉइड ऑटोसह , १२.३ इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस फोन चार्जर, ADAS फिचर मिळते. सेफ्टी फीचर्समध्ये तुम्हाला कारमध्ये ड्युअल LED हेडलॅम्प्स, इलेक्ट्रिक सनरूफ, ६०.४० स्प्लिट रिअर सीट, १९ इंचाचे अलॉय व्हील्स आणि १२.३ इंचाचा टचस्क्रीन असे फीचर्स यामध्ये मिळतात.

हेही वाचा : दरमहिना भरा फक्त ९९ हजार अन् घरी घेऊन जा जबरदस्त मायलेज देणारी ८ लाखांची टाटाची ‘ही’ कार

काय आहे किंमत ?

EV6 GT Line ची सुरुवातीची (एक्स-शोरूम) किंमत ६०.९५ लाख रुपये अणि EV6 GT Line AWD ची सुरुवातीची (एक्स-शोरूम) किंमत ६५.९५ लाख रूपये आहे. कंपनीने एक निवेदनामध्ये ही माहिती दिली आहे. Kia ने २०२२ मध्ये आपली पूर्ण इलेक्ट्रिक कार EV6 लॉन्च केली होती. जून २०२२ मध्ये हे वाहन कंपनीने लॉन्च केले होते. ही कार भारतामध्ये CBU म्हणजेच कंप्लिट बिल्ट युनिट अंतर्गत आयात केली जाते. ही कार एकदा चार्ज केली की ७०८ किमी धावते असा कंपनीचा दावा आहे.