scorecardresearch

Auto Expo 2023: Maruti Suzuki Jimny 5 door लाँच; पाहा कशी दिसते ही आकर्षक कार, ‘इतक्या’ रुपयांत करा बुकिंग

Maruti Suzuki Jimny: मारुती सुझुकीने आपली पहिली ऑफ रोड एसयूव्ही Maruti Suzuki Jimny 5 door भारतात लाँच केले आहे.

Auto Expo 2023: Maruti Suzuki Jimny 5 door लाँच; पाहा कशी दिसते ही आकर्षक कार, ‘इतक्या’ रुपयांत करा बुकिंग
Maruti Suzuki Jimny 5 door लाँच (Photo-financialexpress)

Maruti Suzuki Jimny: देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने ऑटो एक्सपो 2023 मध्ये आज दुसऱ्या दिवशी म्हणजेच १२ जानेवारी रोजी आपली बहुप्रतिक्षित ‘SUV Maruti Suzuki Jimny 5 door’ लाँच केली आहे. ४ मीटरपेक्षा कमी लांबीची जिमनी खूपच आकर्षक दिसते आहे आणि तिचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ही 5 दरवाजाची आवृत्ती आहे. या लाँचिंगसोबतच कंपनीने एसयूव्हीचे बुकिंग देखील सुरू केले आहे.चला जाणून घेऊया ही कार कशी आहे खास

Maruti Suzuki Jimny 5 door अशी आहे खास

जिम्नी 5-डोर व्हेरिएंटची लांबी ३,८५० मिमी, रुंदी १,६४५ मिमी आणि उंची १,७३० इतकी मिमी आहे. या एसयूव्हीचा व्हीलबेस २,५५०mm आहे. तर, लांबी आणि व्हीलबेस ३०० मिमीने वाढली आहे. 5 डोअर जिम्नीला सध्याच्या ३ डोअर जिम्नीच्या तुलनेत बॉक्सी आणि रेट्रो इन्स्पायर्ड डिझाइन आहे. याचा व्हीलबेस ३०० मिमी आहे. तसेच, सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत फ्रंट ग्रिल आणि बंपर वेगळ्या डिझाइनमध्ये बनवण्यात आले आहेत.

Maruti Suzuki Jimny 5 door ची पाहा झलक

(हे ही वाचा : Auto Expo 2023: मस्तच! ऑटो एक्स्पोत सादर झाली भन्नाट इलेक्ट्रिक SUV सोबत पोलिसांसाठी ‘ही’ खास कार )

Maruti Suzuki Jimny 5 door फीचर्स

मारुती सुझुकीने जिम्नी ५ डोरमध्ये ४ सिलेंडर १.५ लीटर के-१५-बी पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन १०१ बीएचपी पॉवर आणि १३० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५ स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन आणि ४ स्पीड ऑटोमेटिक ट्रान्समिशनसह येते. तसेच, ४X४ व्हील ड्राइव्ह फीचर देखील मिळते.

Maruti Suzuki Jimny 5door ला LED हेडलाइट्स E. टेल लाइटमध्ये एलईडी लॅम्पही आहेत. या कारमध्ये ७ इंचांची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जी अ‍ॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करेल. यात हिल होल्ड असिस्टंटचेही फीचर आहे.

(Photo-financial express)

(हे ही वाचा : Auto Expo 2023: पहिल्याच दिवशी Maruti पासून ते Hyundai पर्यंत ‘या’ कंपन्यांच्या गाड्यांची देशात धूम; पाहा झलक)

Maruti Suzuki Jimny 5 door कशी कराल बुकींग?

Maruti Suzuki Jimny 5 door खरेदी करण्यासाठी तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरुन याची बुकिंग करू शकता. किंवा जवळच्या मारुती सुझुकी डीलरशीपकडेही जाऊन सुद्धा तुम्हाला या कारची बुकिंग करता येईल. या नवीन ऑफ रोड एसयूव्हीच्या बुकिंगसाठी तुम्हाला ११ हजार रुपये टोकन रक्कम द्यावी लागेल.

(हे ही वाचा : Auto Expo 2023: JBM ऑटोने केले इलेक्ट्रिक बसचे लाँचिंग, एकदा चार्ज करताच हजार किलोमीटर धावणार

Maruti Suzuki Fronx लाँच, बुकींग सुरु

सोबतच कंपनीने Fronx, Maruti Suzuki च्या Baleno-आधारित SUV कूपचे ऑटो एक्स्पो 2023 मध्ये अनावरण केले असून या नवीन SUV कूपची विक्री एप्रिलपर्यंत ब्रँडच्या Nexa आउटलेट्सद्वारे केली जाईल. मारुती फ्रॉन्क्सचे बुकिंग आजपासून सुरू झाले आहे. या नवीन एसयूव्हीमध्ये ४ सिलेंडर १.२ लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2023 at 13:34 IST

संबंधित बातम्या