Benefits of Suspension on bike : बाईकमध्ये असे अनेक पार्ट्स आहेत, ज्यामुळे तुम्हाला सुरक्षित आणि आरामदायी रायडिंग करता येते. त्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे सस्पेंशन सिस्टम. सस्पेन्शन सिस्टीमचे काम बाईकला खडबडीत रस्त्यांवर स्टेबल ठेवणे आणि आरामदायी प्रवासासाठी मदत करणे.
तुमच्या बाईकमध्ये सस्पेन्शन सिस्टीम नसेल तर प्रत्येक लहान-मोठे खड्डे आणि खडबडीत रस्त्यांवर बाईक चालवताना खूपच अडचणी येतात. यामुळे रायडिंगची मजा पूर्णपणे खराब होऊ शकते. या कारणास्तव, ॲडव्हेंचर बाईक्समध्ये हल्ली सस्पेशन सिस्टीमकडे अधिक लक्ष दिले जाते, कारण ॲडव्हेंचर बाइक्स खास डोंगराळ आणि खडबडीत रस्त्यांवर प्रवास करण्यासाठी बनविल्या जातात.
यात तुम्ही चालवत असलेल्या बाईकमध्ये किंवा खरेदी करणार असलेल्या बाईक, स्कूटीमध्ये कोणत्या प्रकारचा सस्पेन्शन सेटअप आहे आणि तो तुम्हाला सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी मदत करतो की नाही हेही जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आज आपण बाईकमधील सस्पेंशन सेटअपबद्दल जाणून घेऊ…
सस्पेंशन सेटअपचे किती प्रकार आहेत?
१) फ्रंट फोर्क सस्पेंशन : हे बाईकमधील सर्वात सामान्य प्रकारचे सस्पेंशन आहे, जे बाईकच्या पुढच्या चाकासाठी वापरले जाते. ज्याला टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशन असेदेखील म्हणतात. ज्यामध्ये वर्टिकल स्पीड कमी करण्यासाठी स्प्रिंग्स आणि डॅम्पर्स वापरतात.
२) स्विंगआर्म रियर सस्पेंशन : हे बाईकच्या मागील चाकासाठी वापरले जाते, ज्यामध्ये वर्टिकल आणि होरिजोंटल स्पीड कमी करण्यासाठी हिंग्ड आर्म आणि स्प्रिंग्स किंवा डॅम्पर्स वापरले जाते. याला मोनोशॉक किंवा ड्युअल शॉक म्हटले जाऊ शकते. या सस्पेन्शन सिस्टीममुळे बाईक व्यवस्थितरीत्या हाताळता येते, खराब रस्त्यांवरही स्थिरता राखता येते आणि विशेषत: आरामदायी प्रवास करता येतो.
३) डायरेक्ट लिंकेज सस्पेंशन : ही अधिक चांगली आणि कार्यक्षम अशी सस्पेंशन सिस्टीम आहे, यामुळे बाइकवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता येते; परंतु ही अधिक जटिल आणि महाग आहे.
बाईकमधील सस्पेंशन सिस्टीमची काळजी कशी घ्यायची?
बाईकमधील सस्पेंशन सिस्टीम नियमितपणे तपासणे महत्त्वाचे आहे, विशेषत: जर तुम्ही खराब रस्त्यांवरून बाईक चालवत असाल. सस्पेंशनमध्ये लिकेज होऊ नये यासाठी नियमितपणे ते तपासा, कारण यामुळे बाईकची कार्यक्षमता कमी होऊ शकते. तुमचे वजन आणि राइडिंग स्टाईलनुसार सस्पेंशन योग्यरित्या सेट करा. सस्पेंशन सिस्टम मॅनिफॅक्चररद्वारे सर्व्हिस करणे महत्त्वाचे आहे.
सस्पेंशनचे काम काय आहे?
१) कंफर्ट : सस्पेंशनमुळे खड्डेमय रस्ते आणि इतर अडथळ्यांमुळे मिळणारे धक्के कमी होऊ शकतात, ज्यामुळे अधिक आरामात रायडिंगचा आनंद घेऊ शकता.
२) कंट्रोल : चांगल्या सस्पेंशन टायर्सचा जमिनीशी चांगला संपर्क राखण्यास मदत करतात. परिणामी कंट्रोल आणि स्टॅबिलिटी अधिक चांगली मिळते. विशेषत: खराब रस्त्यांमध्ये चांगले सस्पेंशन खूप उपयुक्त आहे.
३) सेफ्टी : सस्पेंशनमुळे ब्रेकिंग परफॉर्मेन्सदेखील सुधारतो, यामुळे चाके जमिनीशी जोडलेली राहतात; ज्यामुळे अधिक प्रभावीपणे थांबणे शक्य होते.