Two-Wheeler Sales in January 2024: भारतात दुचाकींची खूप मोठी बाजारपेठ आहे. हिरो मोटोकॉर्प ही यात सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीच्या भारतात सर्वाधिक दुचाकी विकल्या जातात. जानेवारीच्या शेवटच्या महिन्यातही हिरो मोटोकॉर्पने भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक दुचाकींची विक्री केली आहे. जानेवारी २०२४ मध्ये Hero, Honda, TVS, Bajaj, Suzuki आणि Royal Enfield ने भारतीय बाजारपेठेत किती विक्री केली जाणून घेऊया…

हिरो

Hero MotoCorp ने जानेवारी २०२४ मध्ये ४,२०,९३४ युनिट्सची विक्री केली आहे, जी वार्षिक आधारावर २०.४६ टक्क्यांनी वाढली आहे. जानेवारी २०२३ मध्ये ३,४९,४३७ मोटारींची विक्री झाली होती.

Hyundai Aura
बाकी कंपन्या पाहतच राहिल्या; देशातील बाजारात ‘या’ स्वस्त सेडान कारचा जलवा; झाली दणक्यात विक्री, मायलेज २२ किमी
SAI recruitment 2024 job post
SAI recruitment 2024: भारतीय क्रीडा प्राधिकरणात नोकरीची संधी! मिळणार ‘इतक्या’ लाखांचा पगार…
Increase in number of cancer patients in India
भारताला कर्करोगाचा विळखा आणखी घट्ट! जाणून घ्या कोणत्या कर्करोगाचा धोका वाढला…
Best Selling 7 Seater Car
Innova ना Fortuner मारुतीच्या ‘या’ स्वस्त ७ सीटर कारसमोर सर्वांची बोलती बंद; दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी

होंडा

Honda जानेवारी २०२४ मध्ये दुसऱ्या स्थानावर राहिली, होंडाने ३,८२,५१२ युनिट्सची विक्री केली, जी जानेवारी २०२३ मध्ये विकल्या गेलेल्या २,७८,१४३ युनिट्सपेक्षा ३७.५२ टक्के जास्त आहे.

(हे ही वाचा : नवीन कार खरेदी करताय? मारुतीच्या ‘या’ ५ स्वस्त गाड्यांवर मिळतोय बम्पर डिस्काउंट, ६२ हजार रुपयांपर्यंत होणार बचत!)

टिव्हीएस

TVS विक्री देखील जानेवारी २०२४ मध्ये २३.९१ टक्क्यांनी वाढली आणि २,६८,२३३ युनिट्सवर पोहोचली, जी जानेवारी २०२३ मध्ये २,१६,४७१ युनिट्स होती. त्याची विक्री ५१,७६२ युनिट्सनी वाढली आहे.

बजाज ऑटो

बजाज ऑटोने गेल्या महिन्यात १,९३,३५० युनिट्सची विक्री केली आहे, जी जानेवारी २०२३ मध्ये विकल्या गेलेल्या १,४२,३६८ युनिट्सपेक्षा ३५.८१ टक्के अधिक आहे.

सुझुकी

सुझुकीने जानेवारी २०२४ मध्ये ८०,५११ युनिट्सची विक्री केली आहे तर जानेवारी २०२३ मध्ये त्याची एकूण विक्री फक्त ६६,२०९ युनिट्स होती. त्याची विक्री वार्षिक आधारावर २१.६० टक्क्यांनी वाढली आहे.

रॉयल एनफिल्ड

रॉयल एनफिल्डने गेल्या महिन्यात ७०,५५६ युनिट्सची विक्री केली आहे. त्याची विक्री वार्षिक आधारावर ४.२२ टक्क्यांनी वाढली आहे. जानेवारी २०२३ मध्ये फक्त ६७,७०२ युनिट्स विकल्या गेल्या होत्या.