Royal Enfield Best Selling Bike:  रॉयल एनफिल्ड कंपनीच्या बाईक्सला चांगलीच पसंती मिळत आहे. आत्तापर्यंत रॉयल एनफिल्डच्या क्लासिक 350 आणि बुलेट 350 या बाईकला सर्वाधिक पसंती दिली जात होती. पण कंपनीच्या एका स्वस्त बाईकने बुलेटला खूप मागे सोडले. Royal Enfield Hunter 350 बाईक भारतीय बाजारात धमाल करत आहे. ही बाईक कंपनीसाठी गेम चेंजर ठरत असून लोकांच्या मनावर राज्य करत आहे. ही सध्या कंपनीची दुसरी सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे आणि बुलेट 350 पेक्षा जास्त विकली जात आहे.

जर आपण रॉयल एनफिल्डच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या बाइक्सबद्दल बोललो तर, रॉयल एनफिल्डच्या क्लासिक 350 ने एप्रिल महिन्यात पहिले स्थान मिळवले. त्याची २६,७८१ युनिट्स विकली गेली. यानंतर, रॉयल एनफिल्ड हंटर 350 ने एप्रिल महिन्यात १५,७९९ युनिट्सची विक्री करून दुसरे स्थान पटकावले. या दोन्ही बाइक्सनी कंपनीच्या सर्व मॉडेल्सना मागे टाकले आहे. रॉयल एनफील्ड बुलेटने तिसर्‍या स्थानावर आपले स्थान निर्माण केले, जे केवळ ८,३९९ युनिट्स विकू शकले.

Bengaluru company charges
चक्क झाडाला मिठी मारण्यासाठी ही कंपनी आकारतेय १५०० रुपये! नेटकरी म्हणे, “मार्केटमध्ये आला नवा Scam”
Raigad, Explosion in company, Mahad MIDC,
रायगड : महाड एमआयडीसीतील कंपनीमध्ये स्फोट, कोणतीही जीवितहानी नाही
restaurant inside metro coach nmrc introduces unique metro coach restaurant at sector 137 station know seating capacity read all details
आता मेट्रोमध्ये करु शकता पार्टी अन् मीटिंग; ‘या’ ठिकाणी सुरू होतेय मेट्रो कोच रेस्टॉरंट
Railway Bharti 2024
Railway Bharti 2024 : रेल्वेमध्ये टेक्निशियनच्या ९००० पेक्षा अधिक पदासाठी होणार भरती, आजच करा अर्ज

(हे ही वाचा: मारुतीच्या ‘या’ SUV कारसाठी ग्राहक झाले वेडे, ५ महिन्यांत ३०,००० हून अधिक लोकांनी केली बुकींग, किंमत फक्त… )

रॉयल एनफील्ड मायलेज

रॉयल एनफिल्डची हंटर 350 बाईक ३४९cc एअर-कूल्ड इंजिन वापरते, जे क्लासिक 350 आणि मेटियर 350 मध्ये देखील आढळते. हे इंजिन २०.२PS चा पीक पॉवर आणि २७Nm चा पीक टॉर्क देते. बाईकला १३-लिटरची इंधन टाकी मिळते, जी शहरात ४०.१९ kmpl आणि महामार्गावर ३५.९७ kmpl चा मायलेज देते.

रॉयल एनफील्ड डिझाइन

रॉयल एनफील्ड हंटर ३५० च्या डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर समोर टर्न सिग्नलसह एक गोलाकार एलईडी हेडलाइट आणि एक डिजिटल स्पीडोमीटर देण्यात आला आहे. यात टियरड्रॉप आकाराची क्रीजसह इंधन टाकी देण्यात आली आहे. ही बाईक अतिशय आकर्षक दिसते. कंपनीने याला अनेक रंग पर्यायांमध्ये लाँच केले आहे.

(हे ही वाचा: KTM RC 200 चे वर्चस्व संपणार? Yamaha ने भारतात दाखल केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत… )

रॉयल एनफील्ड वैशिष्ट्ये

रॉयल एनफील्डची सर्वात स्वस्त बाइक हंटर ३५० मध्ये सेमी डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, ट्रिपल नेव्हीगेशन पॉड (ऑप्शनल), ड्युअल चॅनेल एबीएस, टेलिकस्कोपिक फ्रंट फॉर्क्स, ड्युअल रियर शॉक अब्जॉर्बर, १७ इंचाची अलॉय व्हील, ३०० एमएम फ्रंट डिस्क ब्रेक आणि २७०mm रियर डिस्क ब्रेक सह अन्य खास फीचर्स दिले आहे.

रॉयल एनफील्ड किंमत

Royal Enfield Hunter 350 Retro व्हेरियंटची किंमत १ लाख ४९ हजार ९०० रुपये आहे.

Royal Enfield Hunter 350 Metro व्हेरियंटची किंमत १ लाख ६६ हजार ९०१ रुपये आहे.

Royal Enfield Hunter 350 Metro Rebel व्हेरियंटची किंमत १ लाख ७१ हजार ९०० रुपये आहे.