scorecardresearch

BMW i4 इलेक्ट्रिक कार भारतात सादर, वेग आणि वैशिष्ट्य जाणून घ्या

लक्झरी कार निर्माता कंपनी बीएमडब्ल्यू लवकरच भारतातत आपली इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे.

BMW-i4-electric-car (1)
BMW i4 इलेक्ट्रिक कार भारतात सादर, वेग आणि वैशिष्ट्य जाणून घ्या (Photo- BMW)

लक्झरी कार निर्माता कंपनी बीएमडब्ल्यू लवकरच भारतातत आपली इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक कारचे नाव BMW i4 इलेक्ट्रिक कार असे ठेवले आहे. कंपनीने ही पूर्ण इलेक्ट्रिक कार i4 कूपच्या रूपात सादर केली आहे. कंपनी ४ डोअर व्हेरियंटमध्ये लाँच करेल आणि यासोबत कंपनी BMW i4 M50 X Drive नावाची हाय स्पेक देखील लाँच करेल. बीएमडब्ल्यूने अद्याप ही पूर्ण इलेक्ट्रिक कार लाँच करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी मे २०२२ च्या शेवटच्या आठवड्यात लाँच करू शकते. जर तुम्ही देखील बीएमडब्ल्यूच्या इलेक्ट्रिक कारच्या लाँचबद्दल उत्सुक असाल तर या कारच्या बॅटरी पॅकपासून स्पीड, ड्रायव्हिंग रेंज आणि फिचर्सपर्यंतची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.

बीएमडब्ल्यू E Drive 4 आवृत्तीमध्ये, कंपनीने ८३.९ किलोवॅट क्षमतेचा एक विशेष बॅटरी पॅक दिला आहे. मागील चाकाला उर्जा पुरवणाऱ्या इलेक्ट्रिक मोटरला शक्ती देतो. कंपनीने या बॅटरी पॅकसह दिलेली इलेक्ट्रिक मोटर ३३५ बीएचपीची कमाल पॉवर आणि ४३० एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. या कारच्या ड्रायव्हिंग रेंजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ५९० किमीची रेंज देते.स्पीडबद्दल कंपनीचा दावा आहे की, ही कार फक्त ५.७ सेकंदात ० ते १०० किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठू शकते.

टाटाची नवीन इलेक्ट्रिक कन्सेप्ट एसयूव्ही AVINYA सादर, एका चार्जमध्ये कापणार ५०० किमी अंतर

कंपनीने या कारच्या दुसऱ्या व्हेरियंट, BMW i4 M50X Drive मध्ये देखील हाच बॅटरी पॅक दिला आहे. हा बॅटरी पॅक ५३६ बीएचपीची कमाल पॉवर आणि ७९५ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करतो. या व्हेरियंटच्या ड्रायव्हिंग रेंजबद्दल कंपनीचा दावा आहे की एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ५२१ किमीची रेंज देते. तसेच फक्त ३.९ सेकंदात ० ते १०० किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडतो.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bmw i4 electric car introduced in india know speed and features rmt