बाऊन्स कंपनीने नवीन इन्फिनिटी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. ज्याची सुरुवातीची किंमत ३६ हजार रुपये आहे. ही किंमत बॅटरीशिवाय आहे, तर बॅटरीसह त्याची किंमत ६८,९९९ रुपये आहे. त्याचवेळी कंपनीने या स्कूटरचे बुकिंग सुरू केले आहे. जे तुम्ही फक्त ४९९ रुपये देऊन सहजपणे बुक करू शकता आणि त्याची डिलिव्हरी पुढील वर्षी मार्चमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया या स्कूटरच्या वैशिष्ट्यांबद्दल…

कंपनीने दोन सेगमेंटमध्ये स्कूटर केली लॉंच

बाऊन्स कंपनीने ५ रंग आणि २ सेगमेंटमध्ये इन्फिनिटी सादर केली आहे. ज्यामध्ये बॅटरीशिवाय स्कूटरही खरेदी करता येते. दुसरीकडे, तुम्ही दुसऱ्या पर्यायामध्ये बॅटरीसह ही स्कूटर खरेदी करू शकता. तसेच, इन्फिनिटीकडून ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉंच केल्यामुळे, बजाज चेतक, TVS iQube आणि Ather ४५०X सारख्या स्कूटर्सना टक्कर मिळणार आहे. कारण या सर्व इलेक्ट्रिक स्कूटर खूप महाग आहेत.

भिवडी प्लांटमध्ये उत्पादन सुरू

राजस्थानमधील भिवडी प्लांटमध्ये या स्कूटरची निर्मिती केली जात आहे. बाऊन्स कंपनीच्या मते, २०२१ मध्ये सुमारे ५२ कोटी रुपयांमध्ये २२ मोटर्सचे १०० टक्के अधिग्रहण करण्यात आले आहे. या डीलअंतर्गत इलेक्ट्रिक वाहन निर्मात्याने राजस्थानमधील २२ मोटर्सच्या भिवडी प्लांटवर आणि तेथील मालमत्तेवर हक्क संपादन केला आहे. प्लांट दरवर्षी १,८०,००० स्कूटर तयार करू शकतो. याशिवाय कंपनी दक्षिण भारतात एक नवीन प्लांट सुरू करण्याचा विचार करत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका चार्जमध्ये ८५ किमीची देते रेंज

बाउन्स इन्फिनिटीसह २ kW-R लिथियम-आयन बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. जे एका चार्जमध्ये ८५ किमीची रेंज देते. या EV चा कमाल वेग ६५ किमी/तास आहे. बाऊन्स इन्फिनिटीमध्ये ड्रॅग मोड देखील देण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने स्कूटर पंक्चर झाली तरी चालवता येते. नवीन ईव्हीला स्मार्ट अॅपशी देखील जोडले जाऊ शकते, ज्यामुळे वैशिष्ट्ये वापरणे अधिक सोपे होईल.