वातावरण थंडगार होऊ लागलं, हिवाळा सुरू होण्याची चाहूल लागली की, यादरम्यान आपण उबदार कपडे म्हणजे स्वेटर, शॉल, जॅकेट आपल्याजवळ ठेवतो. जसं थंडीपासून आपण स्वतःचं संरक्षण करतो, तसंच यादरम्यान प्रवास करतानाही आपण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून कोणताही अपघात होणार नाही. कारण थंडीमुळे रस्ते ओले होतात आणि प्रचंड धुकेसुद्धा असते. राजधानी क्षेत्रामध्ये वायू प्रदूषण हे उच्च पातळीवर आहे. नवी दिल्ली हे अलीकडेच “जगातील सर्वात प्रदूषित शहर” म्हणून गणले गेले आहे; तर एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) वाढल्यामुळे धुक्यामध्ये वाहन चालविण्यासाठी या सुरक्षित टिप्सचा नक्की उपयोग करून पाहा…

स्पीड कमी ठेवा :

दाट धुक्यात गाडीचा स्पीड स्लो आणि स्थिर ठेवा, जेणेकरून समोर एखादी व्यक्ती येताना दिसल्यास ब्रेक दाबण्यासाठी पुरेसा वेळ देता येईल; त्यामुळे वारंवार स्पीडमीटर तपासात राहा.

हाय बीमवर गाडी चालवू नका :

धुक्यामध्ये गाडी चालवताना अनेक जण हाय-बीम हेडलाइट्स चालू ठेवतात. पण, अशावेळी हेडलाइट्स कमी बीमवर ठेवा. यामुळे पुढचे वाहन दिसण्यास मदत होईल आणि गाडीची दिशा योग्य आहे की नाही हे जाणून घेण्यासही मदत होईल. शक्य असल्यास फॉग लँप वापरा आणि मार्गदर्शनसाठी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या रिफ्लेक्टरवर लक्ष केंद्रित करा.

हेही वाचा…Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज

लक्ष केंद्रित करा :

धुके असणाऱ्या परिस्थितीत ड्रायव्हिंग करताना एखाद्याने १०० टक्के लक्ष रस्त्यावर केंद्रित केले पाहिजे. अशावेळी कारमधील साउंड सिस्टम बंद करा, फोन वापरणे टाळा. त्याचप्रमाणे जर तुमच्या कारमध्ये क्रूझ कंट्रोल फंक्शन असल्यास, सुरक्षिततेच्या उद्देशाने ते डिॲक्टिव्हेट करा.

सुरक्षित अंतर ठेवा –

तुमचे वाहन आणि तुमच्या पुढे असणाऱ्या कारमध्ये अंतर ठेवा. तुम्ही अचानक ब्रेक लावल्यास तुमची कार कोणालाही धडकणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येल्लो लाईटचा वापर करा –

येल्लो लाईट तुम्हाला धुक्यात मदत करू शकतो, कारण धुक्यात व्हाईट लाईट फारसा प्रभावी नसतो, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही येल्लो कलरची ट्रान्सपरेंट शीटदेखील वापरू शकता, तुम्ही ती टेपने बसवू शकता.