scorecardresearch

बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीकडे आहे लक्झरी कारचा मोठा संग्रह! किंमत वाचून तुम्हीही व्हाल थक्क

बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीलाही आहे महागड्या कारचा शौक.

बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीकडे आहे लक्झरी कारचा मोठा संग्रह! किंमत वाचून तुम्हीही व्हाल थक्क
दीपिका पदुकोणकडे आहे आलिशान कारचा मोठा संग्रह. (Photo-financialexpress)

Deepika Padukone Car Collection: बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी दीपिका ही बॉलिवूडमधील सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री मानली जाते. सौंदर्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर तिने सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज ५ जानेवारी सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणचा वाढदिवस आहे. दीपिका आज वयाचे ३६ वे वर्ष पूर्ण करत आहे. दीपिका तिच्या अभिनयानं आणि स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. दीपिकालाही महागड्या कारचा छंद आहे. आज आपण दीपिकाकडे कोणकोणत्या महागड्या कारचे कलेक्शन आहे, हे जाणून घेऊया.

दीपिकाकडे ‘या’ आहेत महागड्या कार

Mercedes Maybach SUV
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने सप्टेंबर महिन्यात नवीन मर्सिडीझ-मेबॅक जीएलएस ६०० ही कार खरेदी केली होती. २०२१ मध्ये रणवीर सिंहने एसयूव्ही खरेदी केल्यानंतर त्यांच्या कुटुंबातली ही दुसरी जीएलएस ६०० कार आहे. या कारची एक्स शोरूम किंमत जवळपास ३ कोटी रुपये इतकी आहे.

Audi Q7

दीपिकाकडे ऑडी Q7 कार आहे, जी तिने २०११ मध्ये खरेदी केली होती. Audi Q7 ही दीपिकाची पहिली लग्झरी कार होती. या कारची एक्स-शोरूम किंमत ७० ते ८० लाख रुपये आहे.

Mercedes Maybach 500

दीपिका बर्‍याचदा मर्सिडीज मेबॅक 500 मध्ये दिसते. ही कार त्याची आवडती आहे. Mercedes Maybach 500 ही सर्वोत्कृष्ट लक्झरी कारपैकी एक आहे. या कारची किंमत १.९४ कोटी रुपये आहे.

(हे ही वाचा : तुम्हालाही हवेत उडण्याचा आनंद घ्यायचायं? मग आताच करा ‘Flying Bike’ चं बुकिंग; किंमत…)

Mini Cooper Convertible

एका चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दीपिका पदुकोण मिनी कूपर कन्व्हर्टीबल गाडी चालवताना दिसली. या कारची एक्स-शोरूम किंमत ३५ ते ४० लाख रुपये आहे.

Audi A8 L

दीपिका अनेकदा गडद निळ्या रंगाच्या Audi A8 L मध्ये उतरताना दिसली आहे. दीपिकाशिवाय तिचा पती रणवीर सिंगकडेही अनेक आलिशान कार आहेत. या कारमध्ये दोघेही अनेकदा एकत्र दिसले आहेत.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2023 at 10:45 IST

संबंधित बातम्या