Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कायम कोणत्या न कोणत्या मुद्यांवरून चर्चेत असतात. ट्रम्प यांच्या आयात शुल्क (टॅरिफ) धोरणांची जगभरात चर्चा सुरू आहे. एवढंच काय तर आयातशुल्क धोरणांमुळे जगातील अनेक देशांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. एवढंच काय तर ट्रम्प यांच्या धोरणांचा अनेक मोठमोठ्या वाहन निर्मात्या कंपन्यांनाही फटका बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता जर्मनीतील आघाडीच्या कार कंपनीला अमेरिकेत प्लांट (कारखाना) उभारण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची योजना अडचणीत आणत असल्याचं वृत्त आहे. अमेरिकेत ऑडीचा कारखाना टाकण्यासाठी जर्मनीतील ऑडी कामगारांनी अट घातली असून दिर्घकालीन उत्पादनाची हमी देण्याचा आग्रह धरला आहे.
दरम्यान, ब्लूमबर्गच्या एका वृत्तानुसार, ऑडीच्या एका कामगार अधिकाऱ्याने सांगितलं की, ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे अमेरिकेत कारखाना बांधण्यापूर्वी जर्मन कार उत्पादक कंपनीने जर्मनीमध्ये नोकऱ्या आणि उत्पादन सुरक्षित केलं पाहिजे. फोक्सवॅगन एजीच्या मालकीचा ब्रँड अमेरिकेत स्वतःचं उत्पादन केंद्र स्थापन करण्यासाठी अनेक पर्यायांचा आढावा घेत असल्याचं बोललं जातं. जिथे बीएमडब्ल्यू आधीच एक प्लांट चालवते आणि स्काउट नेमप्लेटसाठी दुसरा प्लांट उभारत आहे. ऑडीचे कामगार नेते केवळ व्यवस्थापनाने घरी नोकऱ्या आणि उत्पादनासाठी दीर्घकालीन हमी दिल्यास देशात विस्तार करण्यास तयार असल्यातचं कंपनीचे वर्क्स कौन्सिलचे प्रमुख जोर्ग श्लागबॉअर यांनी म्हटलं.
श्लागबॉअर हे ऑडीचे उप-बोर्ड अध्यक्ष देखील आहेत. त्यांनी एका निवेदनात म्हटलं की, “आम्ही या विषयांवर चर्चा करण्यास नकार देत नाहीत. मात्र, क्षमतेच्या कारणास्तव आम्हाला सध्या अमेरिकेत प्लांट बांधण्याची आवश्यकता वाटत नाही. जर आम्हाला राजकीय कारणांसाठी अमेरिकेत प्लांटची आवश्यकता असेल तर ते जर्मनीतील कर्मचाऱ्यांच्या आणि क्षमतेच्या वापराच्या खर्चांवर असू शकत नाही. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
कारण या वर्षी मार्चमध्ये ऑडीने कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक करार केला होता की २०२९ पर्यंत खरेदी आणि निवृत्तीद्वारे ७,५०० जर्मन पदे कमी केले जातील. हा करार उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी २०३३ पर्यंत नोकरीच्या सुरक्षिततेची हमी वाढवण्याच्या बदल्यात होता. ऑडी कर्मचाऱ्यांना या ऑफरबद्दल माहिती देण्याच्या प्रक्रियेत आहे. पण आतापर्यंत जरी कोणतीही महत्त्वपूर्ण कर्मचारी कपात झालेली नसल्याचं एका कामगार प्रवक्त्याने सांगितलं आहे.
युरोपियन कार उत्पादकांवर ट्रम्प यांचं कर युद्ध?
ट्रम्प यांनी २०२५ च्या सुरुवातीला युरोपियन कार आयातीवर २५ टक्के कर लादला होता. ज्यामुळे युरोपियन युनियनच्या ऑटो मोबाईल्सच्या उद्योगावर मोठा परिणाम झाल्याचं बोललं जातं. खरं तर अमेरिकेला दरवर्षी ५६ अब्ज युरोच्या वाहनांची युरोपियन यूनियन निर्यात करतो. अमेरिकेला निर्यात होणाऱ्या ८२०,००० युरोपियन युनियन कारपैकी ७३ टक्के वाटा असलेल्या फोक्सवॅगन, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज-बेंझ सारख्या जर्मन कार उत्पादकांनाही गंभीर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आयातीवर पूर्णपणे अवलंबून असलेल्या पोर्शला २०२६ पर्यंत ३.४ अब्ज युरोचे उत्पन्न कमी होऊ शकते तर स्टेलांटिसने २०२५ च्या पहिल्या सहामाहीत २.३ अब्ज युरोचं निव्वळ नुकसान नोंदवलं आहे. ३ एप्रिल २०२५ पासून लागू झालेल्या या करवाढीचा उद्देश अमेरिकेच्या उत्पादनाला चालना देणं असला तरी जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत करणं हा देखील आहे. कारण ज्यामुळे वाहनांच्या किमती अंदाजे ३,००० डॉलर्सने वाढल्या आहेत.
तसेच व्यापार करारामुळे १ ऑगस्टपासून कर १५ टक्क्यांपर्यंत कमी झाले. त्यामुळे दिलासा मिळाला. मात्र, तरीही २०२४ पूर्वीच्या २.५ टक्के दरांपेक्षा जास्त आहे. चीनमधील घटत्या विक्री आणि वाढत्या खर्चाशी आधीच झुंजत असलेले युरोपियन वाहन उत्पादक, खर्चाचा भार वाढवू शकतात. युरोपियन युनियन प्रत्युत्तरात्मक शुल्क आकारण्याचा विचार करत असल्याने व्यापक व्यापार युद्धाचा धोका निर्माण होऊ शकतो.