Car Door Opening Tips: देशातील अनेक लोक कारचा वापर करतात. परंतु अनेकांना कारविषयी फारशी माहिती नसते. असाच कारचा एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे दरवाजा. देशातील बहुतेक कारचालकांना कारचा दरवाजा कोणत्या हाताने उघडावा हे माहीत नसेलच. कारचा दरवाजा उघडण्याचाही योग्य मार्ग आहे. गाडीचा दरवाजा अतिशय काळजीपूर्वक उघडावा कारण तुमच्या निष्काळजीपणामुळे अपघातही होऊ शकतो. मग चला तर जाणून घेऊया कारचा दरवाजा उघडण्याचा योग्य मार्ग कोणता…
कारचा दरवाजा कोणत्या हाताने उघडावा?
वास्तविक, ड्रायव्हरने कारचा दरवाजा डाव्या हाताने उघडला पाहिजे (उजव्या हाताने वाहन चालवणाऱ्या देशांमध्ये). कारण कारमधून बाहेर पडताना तुम्हाला चांगले संतुलन राखण्यास मदत होईल, त्यासोबतच तुम्ही कारचा दरवाजा अधिक सुरक्षितपणे उघडू शकाल.
वास्तविक, जेव्हा कारचा दरवाजा उघडण्यासाठी ड्रायव्हर आपला डावा हात पुढे करेल तेव्हा त्याला दरवाजाकडे झुकावे लागेल. हे करत असताना चालकाची नजर आपोआप गाडीच्या ORVM वर पडेल, जेणेकरून मागून कोणतंही वाहन किंवा व्यक्ती येत तर नाही हे त्याला कळेल. कोणतेही वाहन किंवा व्यक्ती येत असल्यास ते दरवाजा उघडण्यापासून थांबू शकते.गाडीचा दरवाजा अतिशय काळजीपूर्वक उघडावा कारण तुमच्या निष्काळजीपणामुळे अपघातही होऊ शकतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने ते अधिक चांगले आहे. आपण व्यस्त रस्त्याच्या कडेला उभे असताना या गोष्टी लक्षात ठेवणे विशेषतः महत्वाचे आहे.
(हे ही वाचा : Car Care Tips: तुमच्या कारच्या बॅटरीची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या ‘या’ गोष्टी )
‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
- कारचा दरवाजा काळजीपूर्वक उघडा, कारण निष्काळजीपणामुळे अपघात होऊ शकतो.
- ड्रायव्हरने कारचा दरवाजा डाव्या हाताने उघडावा. याचे अनेक फायदे आहेत, जाणून घ्या…
१. हे तुम्हाला कारमधून बाहेर पडताना चांगले संतुलन राखण्यास आणि सुरक्षितपणे दरवाजा उघडण्यास मदत करेल.
२. डाव्या हाताने दरवाजा उघडल्यावर तुम्हाला दरवाज्याकडे झुकावे लागते, त्यामुळे तुमची नजर आपोआप कारच्या ORVM वर पडते.
३. यामुळे तुम्हाला कळू शकते की, कारच्या मागून कोणतेही वाहन किंवा व्यक्ती तर येत नाही.
४. डाव्या हाताने दरवाजा उघडताना उजव्या हाताला जेवढी शक्ती लागते तेवढी लागत नाही.
५. म्हणजे दार हळू हळू उघडेल आणि मागून एखादं वाहन किंवा व्यक्ती येत असेल तर ORVM मध्ये पाहून तुम्ही दरवाजा सहज उघडण्यापासून थांबवू शकता.