Electric Cycle: लक्झरी आणि पॉवरफुल मोटरसायकलच्या सेगमेंटमध्ये डुकाटीने खास आणि मजबूत ओळख निर्माण केली आहे. त्याचबरोबर आता या कंपनीने इलेक्ट्रिक सायकलच्या बाजारातही प्रवेश केला आहे. डुकाटीने आपली पहिली इलेक्ट्रिक सायकल बाजारात आणली आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे ही कंपनीची फोल्डेबल सायकल आहे. ही सायकल डुकाटी एमजी२० इलेक्ट्रिक फोल्डेबल सायकल (Ducati MG20 Electric foldable cycle) म्हणून सादर करण्यात आली आहे.

डुकाटी एमजी२० इलेक्ट्रिक फोल्डेबल सायकलबद्दल सांगायचे तर, ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक सायकल आहे जिची खासियत म्हणजे तुम्ही ती सहजपणे फोल्ड करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकता. ही सायकल सिटी राइडिंगसाठी तयार करण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Samsung launched on Friday a new variant of its popular budget F15 smartphone Here is all the details
२० हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा सेटअपचा स्मार्टफोन; बॅटरी लाईफ बघून म्हणाल ‘डील Done’
Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य
Electric Cycle
Doodleची इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसला एम एस धोनी, व्हिडीओ झाला व्हायरल
NPCIL Recruitment 2024
NPCIL Recruitment 2024: ट्रेड अप्रेंटिसच्या ३३५ जागांसाठी निघाली भरती, शेवटच्या तारखेपूर्वी करा अर्ज

एका चार्जवर किती किमी धावते?

डुकाटी एमजी२० ही एक इलेक्ट्रिक सायकल आहे आणि एकदा चार्ज केल्यानंतर तुम्ही ५० किमी पर्यंत सहज प्रवास करू शकता. ही इलेक्ट्रिक सायकल हुबेहुब मोटारसायकलसारखीच तयार करण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला मजबूत रिम्स मिळतील आणि डिझाइन खूपच स्लीक आहे. त्यात वापरलेले साहित्य हाताळण्यास सोपे करते.

(हे ही वाचा: सर्वात स्वस्त ७ सीटर कार! लूक एकदम नवीन, पेट्रोलसोबत CNG चाही पर्याय उपलब्ध)

(फोटो: http://www.ducatiurbanemobility )

वॉटरप्रूफ एलसीडी पॅनेल

या सायकलचे वजन खूपच हलके असून वापरकर्त्यांच्या सोयीसाठी तिला वॉटरप्रूफ एलसीडी पॅनल देण्यात आले आहे. म्हणजेच, जर तुम्ही पावसातही सायकल चालवत असाल तर एलसीडी पॅनेलचे कोणतेही नुकसान होणार नाही. पुढचा एलईडी दिवा आणि चाकांवर परावर्तित पट्ट्या ऑप्टिमल विजिबलिटी आणि सुरक्षा प्रदान करण्यास सक्षम आहेत.

(हे ही वाचा: ‘या’ कारने मार्केटमध्ये घातलाय धुमाकूळ; ७८ हजार लोक गाडीच्या डिलिव्हरीच्या प्रतीक्षेत)

किंमत किती?

डुकाटी एमजी२० इलेक्ट्रिक फोल्डेबल सायकलची किंमत डॉलर १,६६३ म्हणजेच सुमारे १.२९ लाख रुपये आहे. मात्र, भारतात त्याची किंमत आणि उपलब्धता याबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.