भविष्याचा विचार करता सर्वच कार कंपन्यांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक कारकडे वळवला आहे. वाढतं प्रदूषण, पेट्रोल-डिझेलच्या चढ्या किंमती यामुळे इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देण्यात येत आहे. मागच्या दिवसात इलेक्ट्रिक वाहनांची प्रचंड मागणी वाढली आहे. मात्र इलेक्ट्रिक वाहनं खरेदी केल्यानंतर ती चार्ज कुठे करायची? असा प्रश्न पडतो. त्यामुळे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स वाढवण्याची मागणी जोर धरत आहे. हे गरज ओळखून हिरो इलेक्ट्रिकनने देशात पुढच्या तीन वर्षात एक लाख चार्जिंग स्टेशन उभारण्याचा मानस केला आहे. यासाठी कंपनीने बंगळुरू येथील इलेक्ट्रिक व्हेहिकल चार्जिंग स्टार्टअपशी करार केला आहे. पहिल्या वर्षात देशातील टॉप ३० शहरांमध्ये १० हजार चार्जिंक स्टेशन्स उभारले जातील. त्यामुळे भविष्यातील मागणी पूर्ण करता येणार आहे.

“आम्हाल विश्वास आहे की देशात इलेक्ट्रिक वाहन विकासाठी चार्जिंग स्टेशन असणं आवश्यक आहे. त्यामुळे हा करार देशातील इलेक्ट्रिक वाहन विक्रिला प्रोत्साहान देईल. ग्राहकांना सहजतेने गाड्या चार्ज करता यावा यासाठी हा खटाटोप आहे. तसेच स्वच्छ आणि प्रदूषणरहित गाड्यांना प्रोत्साहन देण्याचं आमचं ध्येय आहे”, असं हिरो इलेक्ट्रिकचे सीईओ सोहिंदर गिल यांनी सांगितलं.

Huawei इलेक्ट्रिक कारची जोरदार चर्चा!; सिंगल चार्जमध्ये ७०० किमी

इलेक्ट्रिक वाहनं वापरकर्त्यांना मोबाइल अ‍ॅप्लिकेशन आणि वेबसाइट दिली जाईल. या मदतीने गाडी मालकांना त्यांचे जवळचे चार्जिंग स्टेशन सहजपणे शोधता येतील. यासोबतच ते बुकिंग स्लॉट देखील शोधू शकतील.