दुचाकीमध्ये स्कूटर सेगमेंटमध्ये आज मायलेज स्कूटरपासून ते प्रीमियम डिझाईन्स आणि चांगल्या फिचर्स असलेल्या स्कूटर आहेत. यात आज आम्ही १२५ सीसी सेगमेंटच्या दोन स्कूटरबद्दल सांगणार आहोत. त्यांच्या डिझाइनसह मायलेज चांगला आहे. या तुलनेसाठी, आमच्याकडे Hero Maestro Edge 125 आणि Honda Grazia आहेत. या दोन्ही स्कूटरच्या किंमत ते फीचर्सपर्यंत संपूर्ण तपशील सांगू.
Hero Maestro Edge 125: हीरो मैस्ट्रो एज125 ही आकर्षक डिझाइन केलेली स्कूटर आहे. कंपनीने सहा प्रकारांसह बाजारात लाँच केली आहे. स्कूटरमध्ये १२४.६ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन असून ९.१ पीएस पॉवर आणि १०.४ एनएम पीक टॉर्क जनरेट करू शकते. या स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये कंपनीने अॅलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर्ससह पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे संयोजन दिले आहे. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर ६५ किमीचा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. हीरो मैस्ट्रो एज125 ची सुरुवातीची किंमत ७३,४५० रुपये आहे जी टॉप व्हेरियंटवर ८२,३२० रुपयांपर्यंत जाते.




Video: ई-सायकल किट पाहून उद्योगपती आनंद महिंद्रा खूश, व्हिडीओ ट्वीट करत म्हणाले, “अभिमान वाटेल…”
Honda Grazia: होंडा ग्राजिया त्याच्या कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटरच्या यादीत येते. जी कंपनीने तीन प्रकारांसह लाँच केली आहे. या स्कूटरमध्ये १२४ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे ८.२५ पीएस पॉवर आणि १०.३ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. ज्यामध्ये अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर बसवण्यात आले आहेत. स्कूटरच्या मायलेजबद्दल, होंडाचा दावा आहे की ती ४९ किमीचा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. होंडा ग्राजियाची सुरुवातीची किंमत ७८,३८९ रुपये आहे, जी त्याच्या टॉप व्हेरियंटवर ८७,६६८ वर जाते.