scorecardresearch

Video: ई-सायकल किट पाहून उद्योगपती आनंद महिंद्रा खूश, व्हिडीओ ट्वीट करत म्हणाले, “अभिमान वाटेल…”

सायकल स्वस्त असल्याने सर्वसामान्यांच्या घरी पाहायला मिळते. आता तुमच्या घरी असलेल्या सायकलचं रुपांतर ई-सायकलमध्ये करू शकता.

Video: ई-सायकल किट पाहून उद्योगपती आनंद महिंद्रा खूश, व्हिडीओ ट्वीट करत म्हणाले, “अभिमान वाटेल…”
Video: ई-सायकल किट पाहून उद्योगपती आनंद महिंद्रा खूश, व्हिडीओ ट्वीट करत म्हणाले, "अभिमान वाटेल…"

सायकल हे प्रवासासाठी सर्वात जास्त वापरलं जाणारं वाहन आहे. कारण सायकलला इंधनाची आवश्यकता नसते, पायडल मारून इच्छित ठिकाणी पोहोचता येते. त्याचबरोबर सायकल स्वस्त असल्याने सर्वसामान्यांच्या घरी पाहायला मिळते. आता तुमच्या घरी असलेल्या सायकलचं रुपांतर ई-सायकलमध्ये करू शकता..हो हे शक्य आहे. तुमच्या सायकलचं रुपांतर ई-सायकलमध्ये होऊ शकतं आणि त्याचा वेग २५ किमी प्रतितास वाढवू शकता. गुरुसौरभ सिंग यांनी तयार केलेलं ध्रुव विद्युत इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किट (DVECK) सध्या चर्चेचा विषय आहे. या उपकरणाने महिंद्रा आणि महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांचे लक्ष वेधून घेतले आहे. साध्या सायकलला इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करू शकणार्‍या नाविन्यपूर्ण निर्मितीचा व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा ट्विटरवर शेअर केला आहे.

“गेल्या काही दिवसांपासून सायकवरून फेऱ्या मारत आहेत. सायकल चालवणारे जगातील पहिले उपकरण नाही. पण हे एक उत्कृष्ट डिझाइन आहे. कॉम्पॅक्ट आणि कार्यक्षम आहे. खडबडीत, चिखलात व्यवस्थितरित्या चालते आणि सुरक्षित देखील आहे. यात एक फोन चार्जिंग पोर्ट आहे,” अशी पोस्ट उद्योपती आनंद महिंद्र यांनी व्हिडीओ शेअर करताना लिहीली आहे.

देशात ५८ टक्के लोकं सायकलचा प्रवासाठी वापर करतात. अपग्रेड केलेल्या सायकलला “आपली स्वदेशी सायकल” असं नाव देण्यात आलं आहे. सायकल एका चार्जमध्ये ४० किमीची रेंज देते आणि १७० किलो वजन उचलण्याची क्षमता आहे. हे उपकरण फायर आणि वॉटर प्रूफ आहे. उपकरण गंजरोधक एअरक्राफ्ट ग्रेड अ‍ॅल्युमिनियमपासून तयार केले असून वजनाने हलके आहे. डिव्हाइस सायकल चार्जिंग इनलेट तसेच USB किंवा फोन चार्जिंग आउटलेटसह येते. ५० टक्के क्षमतेपर्यंत सायकल चार्ज करण्यासाठी पेडलिंगसाठी २० मिनिटे लागतात. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी गुंतवणूक करण्यात स्वारस्य दाखवत म्हणाले, “हे व्यावसायिकरित्या यशस्वी होईल किंवा मोठ्या प्रमाणात फायदेशीर असेल हे महत्वाचं नाही, परंतु तरीही मला एक गुंतवणूकदार असल्याचा अभिमान वाटेल. कुणी मला गुरुसौरभशी जोडू शकले तर कृतज्ञ असेल.”

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या