हीरो स्प्लेंडर ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी बाईक आहे. हे अनेक मॉडेल्समध्ये येते, ज्यामध्ये स्प्लेंडर प्लस, सुपर स्प्लेंडर, स्प्लेंडर प्लस XTEC आणि सुपर स्प्लेंडर XTEC यांचा समावेश आहे. यापैकी Hero Spelendor+ ला जास्त मागणी आहे. त्याची किंमत सुमारे ७४ हजार रुपयांपासून सुरू होते, तर टॉप मॉडेलची किंमत ७५ हजार रुपयांपर्यंत पोहोचते. असे बरेच लोक आहेत ज्यांना ही बाईक घ्यायची आहे परंतु बजेटमुळे ते खरेदी करू शकत नाहीत. अशाच ग्राहकांसाठी आज आम्ही ही बाईक स्वस्तात कसे खरेदी करता येईल, यावर माहिती देणार आहोत.

हीरो स्प्लेंडर फक्त १८ हजारात घरी आणा

तुम्हाला त्याचा टॉप व्हेरिएंट (SPLENDOR + I3S DRUM BRAKE BLACK & Accent) विकत घ्यायचा असल्यास, दिल्लीमध्ये त्याची किंमत ७५,८११ रुपये आहे. आता आपण असे गृहीत धरू की, तुम्हाला हा प्रकार २० टक्के डाउनपेमेंटवर (रु. १८,०००) खरेदी करायचा आहे. येथे आम्ही ३ वर्षांचा कर्जाचा कालावधी आणि बँकेचा व्याजदर ९.७ टक्के गृहीत धरत आहोत.

(हे ही वाचा : ८० हजाराच्या स्कूटरसमोर Ola S1, TVS Jupiter सह सर्वांची बोलती बंद, ३० दिवसात १.३० लाख लोकांनी केली खरेदी )

अशा परिस्थितीत, तुम्हाला दरमहा फक्त २,६०३ ​​रुपये EMI भरावे लागेल. तीन वर्षांच्या या कर्जामध्ये तुमच्याकडून फक्त १२,६९७ रुपये अतिरिक्त घेतले जातील. आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही त्यानुसार डाउन पेमेंट आणि कर्जाचा कालावधी निवडू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिरो स्प्लेंडर प्लस वैशिष्ट्ये

स्प्लेंडर प्लसला इंस्ट्रुमेंट कन्सोलवर कॉल आणि एसएमएस अलर्टसाठी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह सेगमेंट-फर्स्ट पूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळतो. यात ड्युअल ट्रिपमीटर, रिअल टाइम मायलेज इंडिकेटर आणि लो फ्युएल इंडिकेटर देखील मिळतो. हेडलाइटमध्ये एलईडी डीआरएलची वैशिष्ट्ये आहेत. स्प्लेंडरमध्ये ९७.२cc एअर-कूल्ड इंजिन आहे जे ८.०२PS कमाल पॉवर आणि ८.०५Nm पीक टॉर्क निर्माण करते. हे चार-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.