scorecardresearch

Honda Activa 125 vs Yamaha Fascino 125: किंमत, स्टाईल आणि मायलेजमध्ये कोण वरचढ?, जाणून घ्या

यामाहा Fascino 125 आणि होंडा Activa 125 या दोन स्कूटर तुलनेसाठी आहेत. या दोन्ही गाड्यांच्या किंमतीपासून ते फीचर्सपर्यंत संपूर्ण माहिती मिळेल.

Honda-Activa-125-vs-Yamaha-Fascino-125
Honda Activa 125 vs Yamaha Fascino 125: किंमत, स्टाईल आणि मायलेजमध्ये कोण वरचढ?, जाणून घ्या (फोटो- HONDA, YAMAHA)

दुचाकी क्षेत्रात स्कूटरची मोठी रेंज आहे. मायलेज स्कूटरपासून ते स्पोर्टी डिझाइन आणि हायटेक फिचर्ससह स्कूटर उपलब्ध आहेत. जर तुम्हाला स्वतःसाठी लांब मायलेज असलेली स्टायलिश स्कूटर खरेदी करायची असेल, तर येथे दोन लोकप्रिय स्कूटरचे तपशील दिले आहेत, जाणून घेऊयात. यामाहा Fascino 125 आणि होंडा Activa 125 या दोन स्कूटर तुलनेसाठी आहेत. या दोन्ही गाड्यांच्या किंमतीपासून ते फीचर्सपर्यंत संपूर्ण माहिती मिळेल.

Honda Activa 125: होंडा अ‍ॅक्टिव्हा ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. कंपनीने पाच प्रकारांसह बाजारात लॉन्च केली आहे. या स्कूटरच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये १२४ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे फ्यूल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन ८.२९ पीएस पॉवर आणि १०.३ एनएम पीक टॉर्क जनरेट केलं असून ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला जोडलं जातं. स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टमबद्दल सांगायचे तर, कंपनीने पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन दिले आहे. या स्कूटरच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की, होंडा अ‍ॅक्टिव्हा 125 ६० किलोमीटरचा मायलेज देत असून ARAI द्वारे प्रमाणित आहे. होंडा अ‍ॅक्टिव्हा 125 ची सुरुवातीची किंमत ७४,९८९ रुपये असून टॉप व्हेरियंटवर जाताना ८३,१६२ रुपयांपर्यंत जाते.

Top 3 Safest Cars India: ‘या’ तीन कार सर्वात सुरक्षित, ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीत मिळाले ५ स्टार

Yamaha Fascino 125: यामाहा फसीनो 125 स्कूटर ही लांब मायलेज असलेली प्रीमियम स्टाइल स्कूटर आहे. ही स्कूटर कंपनीने पाच प्रकारांसह लॉन्च केली आहे. या स्कूटरच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने १२५ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे जे फ्यूल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन ८.२ पीएस पॉवर आणि १०.३ एनएम पीक टॉर्क जनरेट करते, जे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला जोडले जाते. स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टमबद्दल सांगायचे तर, कंपनीने पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन दिले आहे. मायलेजबाबत, यामाहा दावा करते की ही फसीनो 125 ६८.७५ किमीचा मायलेज देत असून ARAI द्वारे प्रमाणित आहे. यामाहा फसीनो 125 ची सुरुवातीची किंमत ७२,५०० रुपये आहे, जी टॉप व्हेरियंटवर जाताना ८१,३३० रुपयांपर्यंत जाते.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-04-2022 at 15:40 IST