सणासुदीचा हंगाम सुरू होताच होंडाने पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत आपला दबदबा दाखवला आहे. होंडाची लोकप्रिय स्कूटर अ‍ॅक्टिव्हा बाजारात धमाल करत आहे. होंडा अ‍ॅक्टिव्हा देशातील बेस्ट सेलिंग स्कूटर बनली आहे. ऑगस्ट-२०२२ मध्ये, होंडा अ‍ॅक्टिव्हाने विक्रीच्या बाबतीत देशात पहिले स्थान मिळवले आहे. विक्रीच्या बाबतीत टीवीएस जुपिटर, सुजुकी एक्सेस आणि हीरो प्लेजर यांनाही अ‍ॅक्टिव्हाने मागे टाकले आहे. तिचे आकडे कंपनीने नुकतेच जारी केले आहे.

३० दिवसात ‘इतक्या’ लोकांनी विकत घेतली होंडा अ‍ॅक्टिव्हा

गेल्या महिन्यात होंडा अ‍ॅक्टिव्हाला मोठी मागणी होती. तसेच ऑगस्ट महिन्यात या स्कूटरने जुलै महिन्यातील विक्रीचा विक्रमही मोडला. होंडाची ही स्कूटर जुलै महिन्यात २ लाख १३ हजार ८०७ ग्राहकांनी खरेदी केली होती. त्याच वेळी, मागील महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात २ लाख २१ हजार १४३ ग्राहकांनी ही खरेदी केली आहे.

हे ही वाचा : Honda cars : होंडा कारच्या चाहत्यांसाठी बॅड न्यूज, कंपनी ‘या’ लोकप्रिय कारचे उत्पादन करू शकते बंद

होंडा अ‍ॅक्टिव्हाने मोडला गेल्या वर्षीचाही विक्रम

होंडा अ‍ॅक्टिव्हाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत ८.०५ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये या स्कूटरच्या २  लाख ४ हजार ६५९ युनिट्सची विक्री झाली होती.

होंडा अ‍ॅक्टिव्हा देशात सर्वाधिक विकले जाण्याचे कारण

होंडा अ‍ॅक्टिव्हा ही सर्वात जास्त विकली जाणारी स्कूटर असण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे होंडाची अनेक मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत विकली जातात. होंडा अ‍ॅक्टिव्हा सीरिजच्या तीन स्कूटर विकते. यामध्ये होंडा अ‍ॅक्टिव्हा ६ जी, होंडा अ‍ॅक्टिव्हा १२५ आणि होंडा अ‍ॅक्टिव्हा प्रीमियम एडिशन यांचा समावेश आहे.