Upcoming two-wheeler May 2024: अक्षय्य तृतीयाचा सण आता जवळ आला आहे. या मुहूर्तावर जर तुम्हीही नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच शानदार मॉडेल्सबद्दल सांगणार आहोत, जे मॉडेल्स मे २०२४ मध्ये बाजारात लाँच करण्यात आले आहेत. या बाईक्स तुमच्या बजेटमध्येदेखील आहे आणि फिचर्सदेखील चांगले आहे. जर तुम्ही नवीन स्कूटर किंवा बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर वेळ न घालवता मे महिन्यात येणाऱ्या सर्व टू व्हीलर लॉन्चचे तपशील येथे जाणून घ्या.
यावर्षी जानेवारीच्या Husqvarna ने भारतात आपले Vitpilen 250 आणि Svartpilen 401 मॉडेल लाँच केले आहेत. ज्यांची किंमत क्रमश: 2.19 लाख आणि 2.92 लाख रुपये आहे, जी की एक्स शोरुम किंमत आहे. अपडेटेड मॉडेल्स आता पूर्णपणे नवीन इंजिन, पुन्हा डिझाइन केलेले चेसिस, प्रगत तंत्रज्ञान आणि रीफ्रेश स्टाइलिंगसह लाँच केले गेले आहेत, जे एक मोठा बदल दर्शविते. लॉन्चच्या वेळी, Husqvarna ने खुलासा केला की भारतात स्वीडिश ब्रँडद्वारे आणखी लॉन्च केले जातील. कंपनीने अलीकडेच देशात अपडेट केलेले Svartpilen 250 लॉन्च केले आहे. याला Vitpilen 250 प्रमाणेच अपडेट्स मिळणे अपेक्षित आहे
हिरो झूम 125/झूम 160
Hero MotoCorp ने या वर्षाच्या सुरुवातीला जागतिक हीरो दिनानिमित्त स्कूटरच्या नवीन झूम श्रेणीचे अनावरण केले होते. यामध्ये Xoom 125 आणि Xoom 160 चा समावेश आहे. Hero MotoCorp ही कंपनी मे महिन्यात एक किंवा दोन्ही स्कूटर बाजारात आणू शकते.
बजाज चेतकचे नवीन प्रकार
भारतीय दुचाकी निर्माता कंपनी बजाज ऑटोने चेतक इलेक्ट्रिक स्कूटर लाइनअपमध्ये आपले नवीन अपडेट केलेले मॉडेल लॉन्च केले. बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची स्पर्धा ओला आणि एथर कंपनीशी असेल. ही स्कूटर अर्बन आणि प्रीमियम दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. बाईक निर्मात्याने बॅटरीवर चालणाऱ्या बाईक चेतकची नवीन आवृत्ती सादर करण्याची अपेक्षा आहे. याबद्दल अद्याप कोणतेही तपशील उपलब्ध नाहीत.
हेही वाचा >> मारुती, ह्युंदाईच्या कार नव्हे तर देशातील ‘या’ सर्वात स्वस्त SUV ची तुफान खप, मायलेज २६ किमी, किंमत…
या इलेक्ट्रिक स्कूटरला भारतीय बाजारात खूप पसंती मिळाली आहे. २०१९ मध्ये लॉन्च झाल्यापासून, चेतक इलेक्ट्रिक स्कूटर १४० शहरांमध्ये पोहोचली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या आतापर्यंत एक लाखांहून अधिक युनिट्स विकल्या गेल्या आहेत.