होंडाच्या बाईक्सना भारतीय बाजारात मोठी मागणी आहे. दमदार मायलेज अन् फीचर्समुळे या कंपनीच्या बाईक्स भारतीयांच्या पसंतीस उतरल्या आहेत. बाईक्सची मागणी पाहता कंपनीही आपल्या नव्या बाईक भारतीय बाजारात लाँच करत असते. आता Honda Motorcycle and Scooter India (HMSI) ने बाजारात आपल्या दोन नव्या बाईक लाँच केल्या आहेत.

होंडा ने Honda H’Ness CB350 Legacy Edition आणि Honda CB350 RS New Hue Edition लाँच केले आहेत. नवीन Honda CB350 Legacy Edition आणि CB350 RS न्यू ह्यू एडिशन ऑल-एलईडी लाइटिंग सिस्टमने सुसज्ज आहेत. नवीन H’ness CB350 Legacy एडिशन नवीन पर्ल सायरन ब्लू कलर स्कीममध्ये डिझाइन केले आहे. याला इंधन टाकीवर नवीन बॉडी ग्राफिक्स आणि लेगसी एडिशन बॅज मिळतो, जो १९७० च्या दशकातील प्रख्यात CB350 द्वारे प्रेरित आहे.

Honda CB350 RS न्यू ह्यू एडिशन नवीन स्पोर्ट्स रेड आणि अॅथलेटिक ब्लू मेटॅलिक पेंट स्कीममध्ये उपलब्ध असेल. त्याच्या टँकवर आकर्षक ग्राफिक्स उपलब्ध असतील आणि दोन्ही चाकांवर आणि फेंडरवर स्ट्रिप्स मिळतील. याला बॉडी कलर रियर ग्रॅब हँडल आणि हेडलाइट कव्हर देखील मिळते.

(हे ही वाचा : मारुतीचा नाद करायचा नाय! देशात नव्या अवतारात आणतेय ‘या’ चार कार, मायलेज ४० किमी अन् किमतही कमी )

नवीन आवृत्त्यांमध्ये होंडा स्मार्टफोन व्हॉईस कंट्रोल सिस्टमसह प्रगत डिजिटल-अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळेल. या दोन्ही रेट्रो मोटारसायकलींमध्ये असिस्ट स्लिपर क्लच आणि होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (HSTC) सिस्टीम देखील आहे.

यामध्ये ३४८.३६cc, एअर-कूल्ड, ४-स्ट्रोक, सिंगल-सिलेंडर BS-VI, OBD2, PGM-FI इंजिन आहे, जे ५,५००rpm वर २०.७bhp आणि ३,०००rpm वर ३०Nm जनरेट करण्यास सक्षम आहे. दोन्ही बाईकमध्ये ५-स्पीड गिअरबॉक्स आहे.

किंमत किती?

Honda H’Ness CB350 Legacy Edition २ लाख १६ हजार ३५६ रुपयांत लाँच करण्यात आले असून Honda CB350 RS New Hue Edition ला २ लाख १९ हजार ३५७ रुपयांत लाँच करण्यात आले आहे. या दोन्ही बाईक्ससाठी बुकींग सुरु झाले असून लवकरच देशभरात डिलिव्हरी सुरू होईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.