Hyundai Creta EMI Calculator:  Hyundai Creta ही अशीच एक SUV आहे, जी भारतीय बाजारपेठेत दीर्घकाळ राज्य करत आहे. ही कंपनीची कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे, जी २०१४ मध्ये पहिल्यांदा सादर करण्यात आली होती. त्याचे दुसरे जनरेशन मॉडेल २०२० मध्ये आणले गेले, त्यानंतर त्याची विक्री आणखी वाढली. क्रेटा स्टायलिश डिझाइन, प्रशस्त इंटिरियर आणि विश्वसनीय कामगिरीसाठी ओळखली जाते. कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये ही सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. येथे आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, तुम्ही ही SUV फक्त ४ लाख रुपयांमध्ये घरी कशी खरेदी करता येईल.

Hyundai Creta किंमत

Hyundai Creta SUV ची किंमत १०.८४ लाख ते १९.१३ लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) दरम्यान आहे. तथापि, रस्त्यावरील किंमत आणखी वाढेल. हे एकूण सात ट्रिममध्ये विकले जाते. यात E, EX, S, S+, SX एक्झिक्युटिव्ह, SX आणि SX(O) चा समावेश आहे. Hyundai Creta ६ मोनोटोन आणि १ ड्युअल-टोन कलर पर्यायामध्ये ऑफर केली आहे. ही ५ सीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे, जी मोठ्या बूट स्पेस देते. जर तुम्हाला ही कार लोनवर घ्यायची असेल, तर तुम्ही ४ लाख रुपये भरूनही ती स्वतःची बनवू शकता. येथे आम्ही त्याच्या EMI चे संपूर्ण गणित घेऊन आलो आहोत.

sensex jump 349 point to settle at an all time high of 82134
Share Market Today : सेन्सेक्स ८२ हजारांच्या पुढे ऐतिहासिक उच्चांकावर
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
nifty crosses 25000 mark
निर्देशांक ऐतिहासिक उच्चांकांपासून अवघा अर्धा टक्का दूर; ‘फेड-कपात’ आशावादाने प्रेरित तेजी सलग आठव्या सत्रात 
japans tomiko itooka news
Tomiko Itooka : जगातील सर्वांत वृद्ध व्यक्ती कोण? ‘या’ महिला गिर्यारोहकाने पटकावला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा किताब!
Tata Punch SUV Car
देशातील बाजारपेठेत ६.१३ लाखाच्या SUV समोर क्रेटा, ब्रेझा, नेक्साॅनसह सर्वांची बोलती बंद, झाली दणक्यात विक्री
Houses in Mumbai are not affordable and their installments are as high as 51 percent compared to monthly income
पुण्यात सर्वाधिक परवडणारी घरे, मुंबईत न परवडणारी घरे..! मासिक उत्पन्नाच्या गृहकर्ज मासिक हप्त्याचे गणित देशभर कसे?
Industrial production grew by 4 2 percent in June
औद्योगिक उत्पादनांत जूनमध्ये ४.२ टक्के वाढ ; गत पाच महिन्यांतील सर्वात नीचांकी कामगिरी
lic stake in 282 companies which market value jumped over rs 15 lakh cror
‘एलआयसी’चे भाग गुंतवणुकीचे मूल्य १५ लाख कोटींपुढे; सव्वा तीन वर्षात दुपटीहून अधिक वाढ

(हे ही वाचा: धमाकेदार आॅफर! ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीवर मोफत थायलंड फिरण्याची संधी, अन् ५ हजारांपर्यंत कॅशबॅक )

४ लाखात Hyundai Creta घरी आणा

जर तुम्ही कारच्या बेस व्हेरिएंट (ई पेट्रोल) साठी गेलात तर तुम्हाला रोडवर १२.५४ लाख रुपये मोजावे लागतील. आता आपण असे गृहीत धरू की आपण हे प्रकार कर्जावर खरेदी करत आहात. येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की तुम्ही तुमच्या आवडीनुसार अधिक डाउन पेमेंट देऊ शकता, वेगवेगळ्या बँकांमध्ये व्याजदर वेगवेगळा असतो आणि कर्जाचा कालावधी १ ते ७ वर्षे देखील निवडला जाऊ शकतो.

उदाहरणार्थ, ४ लाख रुपयांचे डाउन पेमेंट, १० टक्के व्याजदर आणि कर्जाची मुदत ५ वर्षे गृहीत धरू. अशा परिस्थितीत, तुम्हाला दरमहा १८,१४७ रुपये EMI भरावे लागेल. तुम्हाला एकूण कर्जाच्या रकमेसाठी (रु. ८.५४ लाख) अतिरिक्त २.३४ लाख रुपये द्यावे लागतील.