scorecardresearch

Premium

५.९९ लाखाच्या ६ एअरबॅग्सवाल्या सर्वात लहान SUV ची देशभरात छप्परफाड विक्री; वेटिंग पीरियड पोहोचला ‘इतक्या’ महिन्यांवर

लाँच होण्यापूर्वीच या मायक्रो एसयूव्हीला १० हजारांपेक्षा जास्त बुकींग मिळाले होते.

Hyundai Exter SUV
Hyunda च्या सर्वात लहान एसयुव्हीला देशभरात मागणी (Photo-financialexpress)

Hyundai Exter Bookings & Waiting Period: मायक्रो SUV ला भारतीय बाजारात मोठी मागणी आहे. यातच Hyundai Motors ने जुलै महिन्याच्या १० तारखेला भारतात लाँच केलेल्या subcompact SUV ला मोठी मागणी आहे.Hyundai Motor ची ही भारतातील सर्वात लहान SUV आहे. या एसयूव्हीला पहिल्या पाच महिन्यांत ग्राहकांचा अप्रतिम प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत या कारला १ लाखाहून अधिक बुकिंग मिळाले आहेत. लाँच होण्यापूर्वीच या मायक्रो एसयूव्हीला १० हजारांपेक्षा जास्त बुकींग मिळाले होते.

किती झाली विक्री?

Hyundai या कारची विक्री चांगली सुरू आहे. ऑक्टोबर २०२३ पर्यंत एकूण ३१ हजार १७४ युनिट्सची विक्री झाली. लाँचच्या पहिल्या महिन्यात ७ हजार युनिट्स, ऑगस्टमध्ये ७ हजार ४३० युनिट्स, सप्टेंबरमध्ये ८ हजार ६४७ युनिट्स आणि ऑक्टोबर २०२३ मध्ये ८ हजार ०९७ युनिट्सची विक्री झाली.

More than 1250 complaints recorded in Sandeshkhali west Bengal
संदेशखालीमध्ये १२५०पेक्षा जास्त तक्रारींची नोंद
Fishermen in Vasai are at risk of extinction
शहरबात: वसईतील मच्छिमार उध्दवस्त होण्याचा धोका
LIC quarterly profit rose 49 percent to Rs 9444 crore
‘एलआयसी’चा तिमाही नफा ४९ टक्के वाढीसह ९,४४४ कोटी रुपयांवर
Veg thali cost increases in Janury and non veg thali rates fall
सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झळ! शाकाहारी थाळी झाली महाग अन् मांसाहारी थाळीचे दर…

Hyundai ‘या’ कारची विक्री जोरात

सध्या ऑटो मार्केटमध्ये Hyundai च्या Hyundai Exter एसयूव्हीला मोठी मागणी आहे. Hyundai च्या लाइनअपमध्ये Exeter खूप लोकप्रिय झाले आहे. सध्या या मायक्रो एसयूव्हीसाठी सरासरी प्रतीक्षा कालावधी सुमारे ४ महिने आहे.

(हे ही वाचा : सर्वाधिक विक्री होणाऱ्या देशातल्या टाटाच्या ‘या’ ४ स्वस्त कारकडे ग्राहकांनी फिरविली पाठ? दुसरीची विक्री फक्त… )

फीचर्स

स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम या कारमध्ये पाहायला मिळतात. प्रत्येक व्हेरिएंटमध्ये ६ एअरबॅग्ज मिळवणारी ही कंपनीची पहिली सब-कॉम्पॅक्ट SUV आहे. कारच्या सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, व्हीकल स्टॅबलिटी मॅनेजमेंट, ESC आणि हिल असिस्ट कंट्रोल यांसारखी इतर फीचर्स देखील आहेत.

यात १.२-लिटर, ४-सिलेंडर, NA पेट्रोल इंजिन आहे. ते पेट्रोलवर ८३bhp/११४Nm आणि CNG वर ६९bhp/९५.२Nm जनरेट करते. यात ५-स्पीड मॅन्युअल आणि ५-स्पीड एएमटी ट्रान्समिशनचा पर्याय आहे. परंतु, CNG आवृत्तीमध्ये फक्त ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स उपलब्ध आहे.

किंमत किती?

या कारची किंमत ५.९९ लाख रुपयांपासून सुरू होते. यात पेट्रोल इंजिनसह सीएनजीचा पर्यायही मिळतो.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hyundai exter crosses 1 lakh bookings waiting period stretches up to 4 months the hyundai exter is priced from rs 6 lakh pdb

First published on: 30-11-2023 at 10:58 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×