सध्या भारतात एसयूव्हीचे मार्केट मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अनेक कंपन्या आपल्या अत्याधुनिक फीचर्स असलेल्या एसयूव्ही भारतीय बाजरपेठेत लॉन्च करत आहेत. सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये अनेक कार्स लॉन्च झाल्या आहेत. त्यामुळे भारतात कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बाजारपेठेमध्ये आपल्या एसयूव्ही मॉडेल्स अपडेट करणे महत्वाचे ठरते. सध्या भारतीय बाजारपेठेत टाटा मोटर्स, किआ इंडिया, ह्युंदाई मोटर्स आणि अन्य कंपन्या आपल्या नवनवीन एसयूव्ही लॉन्च करत आहेत.

सध्या सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये ह्युंदाई व्हेन्यू ही एसयूव्ही सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. मात्र बाजारात अनेक नवीन एसयूव्ही लॉन्च झाल्यामुळे व्हेन्यूच्या विक्रीत थोडीशी घट झाली आहे. जुलैमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप १० एसयूव्हीमध्ये ह्युंदाई व्हेन्यू १०,०६२ युनिट्सच्या विक्रीसह चौथ्या स्थानावर होती. त्यात दरवर्षी (YoY ) १६ टक्के घट नोंदवली गेली आहे. सध्या व्हेन्यूचा बाजारातील हिस्सा १०.६४ टक्के आहे.

हेही वाचा : VIDEO: KTM चे टेन्शन वाढणार? १ नोव्हेंबरला लॉन्च होणार रॉयल एनफिल्डची ‘ही’ अ‍ॅडव्हेंचर बाइक, कंपनीकडून टिझर जारी

एका नवीन मीडिया रिपोर्टनुसार ह्युंदाई २०२५ पर्यंत व्हेन्यूचे नेक्स्ट जनरेशन मॉडेल लॉन्च करू शकते. व्हेन्यूची २०१९ मध्ये भारतात विक्री सुरू झाली होती. ज्याला गेल्या वर्षी मिड-लाइफ फेसलिफ्ट अपडेट देण्यात आले होते. म्हणजेच पुढील मॉडेल हे तीन वर्षांनी बाजारात लॉन्च केले जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यू जनरेशन व्हेन्यू कंपनीच्या नवीन तळेगाव प्लांटमध्ये पहिले उत्पादन म्हणून तयार केले जाईल. याबाबतचे वृत्त autocarindia ने दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ह्युंदाईने अलीकडेच दरवर्षी १,५०,००० युनिट्सची उत्पादन क्षमता असलेला तळेगाव प्लांट ताब्यात घेण्यासाठी करार केला आहे. नवीन-जनरल व्हेन्यूला Q2Xi हे कोडनेम देण्यात आले आहे. तर पहिल्या जनरेशनमधील व्हेन्यूला QXi हे कोडनेम होते. जेथे ‘i’ चा अर्थ भारत आहे. व्हेन्यू सध्या बाजारात १३ व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. त्याची आतापर्यंत भारतात ४,५०,००० पेक्षा जास्त युनिट्सची विक्री झाली आहे. या कारची एक्सशोरूम किंमत ७.७२ लाख रूपयांपासून सुरू होते. तर टॉप व्हेरिएंटसाठीची किंमत १३.१८ लाख रुपयांपर्यंत जाते. व्हेन्यू पाच ट्रीममध्ये उपलब्ध आहे. ज्यात , S, S+/S(O), SX आणि SX(O) यांचा समावेश आहे. व्हेन्यूची स्पर्धा मारूती ब्रीझा आणि फ्रॉन्क्स, टाटा नेक्सॉन (पुढील महिन्यात मोठे बदल होणार आहेत), किआ सोनेट आणि महिंद्रा XUV ३०० सारख्या कॉम्पॅक्ट SUV शी आहे.