भारतात इलेक्ट्रिक टू व्हीलर्सचा बाजार दिवसेंदिवस मोठा होत चालला आहे. गगनाला भिडलेल्या इंधन दरांमुळे भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढतेय, परिणामी देशाच्या बाजारपेठेत गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक शानदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच झाल्यात. तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची आहे, पण बजेटचं टेन्शन असेल तर काळजी करु नका, आज आम्ही तुम्हाला देशातील बाजारपेठेत स्वस्त दरात मिळणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर विषयी माहिती देणार आहोत. जी सर्वसामान्यांनाही परवडणारी असेल…

‘ही’ आहे सर्वात स्वस्त ई-स्कूटर!

Detel Easy Plus ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे आणि ती तुमच्या बजेटमध्येही येते. त्याची किंमत फक्त ३९,९९९ रुपये आहे. ही परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर ऑफिस, शाळा किंवा लहान दैनंदिन कामांसाठी उत्तम पर्याय आहे.

(हे ही वाचा : ६ एअरबॅग्जवाल्या मारुतीच्या स्वस्त SUV कारनं Nexon-Punch चा केला खेळ खल्लास; धडाक्यात झाली विक्री  )

इतक्या’ किलोमीटरपर्यंतची रेंज मिळणार

स्कूटरवरून तुम्हाला ६० किलोमीटपर्यंतची रेंज सिंगल चार्जवर मिळते. स्कूटरला लोड कॅपिसिटी १७०kg आहे. स्कूटरचे ग्राउंड क्लियरेंस १७०mm आहे. स्कूटरची टॉप स्पीड २५kmph आहे. ग्राहकांना ही स्कीटर ५ कलर ऑप्शन मध्ये मिळते. याला मेटेलिक ब्लॅक, मेटेलिक रेड, मेटेलिक येलो, गनमेटल आणि पर्ल वाइट कलर ऑप्शन मध्ये खरेदी करू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैशिष्ट्ये

Detel Easy Plus इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल, ट्यूबलेस टायर्स, ड्रम ब्रेक आणि पेडल्स यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. जर तुमची बाईक रस्त्याच्या मध्येच खराब झाली तर तुम्ही ८४४ ८४४ ०४४९ टोल फ्री क्रमांकावर कॉलही करू शकतात. त्यानंतर कंपनी एक गाडी त्या ठिकाणी पाठवून तुमची मदत करेल.