scorecardresearch

Premium

‘ही’ आहे भारतातली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर; किंमत कमी, मोठ्या रेंजची हमी, एकदा चार्ज केल्यावर धावेल…

तुम्हाला जर स्वस्त किमतीत स्कूटर खरेदी करायचे असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.

Cheapest Electric Scooters
देशातला सर्वात स्वस्त ई-स्कूटर पाहा (Photo-financialexpress)

भारतात इलेक्ट्रिक टू व्हीलर्सचा बाजार दिवसेंदिवस मोठा होत चालला आहे. गगनाला भिडलेल्या इंधन दरांमुळे भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढतेय, परिणामी देशाच्या बाजारपेठेत गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक शानदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच झाल्यात. तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची आहे, पण बजेटचं टेन्शन असेल तर काळजी करु नका, आज आम्ही तुम्हाला देशातील बाजारपेठेत स्वस्त दरात मिळणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर विषयी माहिती देणार आहोत. जी सर्वसामान्यांनाही परवडणारी असेल…

‘ही’ आहे सर्वात स्वस्त ई-स्कूटर!

Detel Easy Plus ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे आणि ती तुमच्या बजेटमध्येही येते. त्याची किंमत फक्त ३९,९९९ रुपये आहे. ही परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर ऑफिस, शाळा किंवा लहान दैनंदिन कामांसाठी उत्तम पर्याय आहे.

Tata Punch Car
टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं सर्वांना फोडला घाम; झाली दणक्यात विक्री, किंमत फक्त…
when spider man come to
स्पायडर मॅन जेव्हा गावाकडे येतो… शेतीचे काम करताना दिसला लहानग्याचा सुपरहिरो, पाहा स्पायडर मॅन शेतकऱ्याचा VIDEO
More than 300 hotels were negligent in security
पनवेल : ३०० हून अधिक हॉटेलांची सुरक्षा वाऱ्यावर
MG Comet EV
देशातील सर्वात लहान अन् परवडणारी इलेक्ट्रिक कार आणखी मिळणार स्वस्तात, किमतीत कंपनीने केली मोठी कपात

(हे ही वाचा : ६ एअरबॅग्जवाल्या मारुतीच्या स्वस्त SUV कारनं Nexon-Punch चा केला खेळ खल्लास; धडाक्यात झाली विक्री  )

इतक्या’ किलोमीटरपर्यंतची रेंज मिळणार

स्कूटरवरून तुम्हाला ६० किलोमीटपर्यंतची रेंज सिंगल चार्जवर मिळते. स्कूटरला लोड कॅपिसिटी १७०kg आहे. स्कूटरचे ग्राउंड क्लियरेंस १७०mm आहे. स्कूटरची टॉप स्पीड २५kmph आहे. ग्राहकांना ही स्कीटर ५ कलर ऑप्शन मध्ये मिळते. याला मेटेलिक ब्लॅक, मेटेलिक रेड, मेटेलिक येलो, गनमेटल आणि पर्ल वाइट कलर ऑप्शन मध्ये खरेदी करू शकता.

वैशिष्ट्ये

Detel Easy Plus इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल, ट्यूबलेस टायर्स, ड्रम ब्रेक आणि पेडल्स यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. जर तुमची बाईक रस्त्याच्या मध्येच खराब झाली तर तुम्ही ८४४ ८४४ ०४४९ टोल फ्री क्रमांकावर कॉलही करू शकतात. त्यानंतर कंपनी एक गाडी त्या ठिकाणी पाठवून तुमची मदत करेल. 

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian ev company has launched detel ev easy plus twowheeler the new e bike comes with a price tag of 39999 pdb

First published on: 07-08-2023 at 15:39 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×