प्रत्येकाला आपल्या गाडीतून प्रवास करत असताना म्युझिक सिस्टीमवर किंवा ब्लूटूथवरून कनेक्ट करून गाणी ऐकायला आवडतात. काही जण तर कंपनीने दिलेले स्पीकर काढून आपल्या आवडीचे स्पीकर बसवतात. बहुतेक कार वापरकर्ते त्यांच्या वाहनात चांगल्या संगीताचा आनंद घेण्यासाठी JBL म्युझिक सिस्टिमला प्राधान्य देतात. Toyota, Nissan , tata motors सह अनेक कंपन्या त्यांच्या कार्समध्ये JBL साउंड सिस्टीमचा वापर करतात. तर Hyundai आणि Kia मध्ये Bose साउंड सिस्टीम वापरतात. आता टोयोटो फॉर्च्युनरबाबत एक एक बातमी समोर आली आहे.
टोयोटाने आता फॉर्च्युनर 4×4 मधून 11 JBL स्पीकर साउंड सिस्टीम काढून टाकली आहे. या व्हेरिएंटमध्ये आता स्टॅंडर्ड ६-स्पीकर साउंड सिस्टीम मिळणार आहे. ही सिस्टीम सर्व मॉडेल्समध्ये उपलब्ध असणार आहे. JBL साउंड सिस्टीम तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहे की कायमचे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
फॉर्च्युनरमधून प्रीमियम ११-स्पीकर साउंड सिस्टीम काढून टाकल्यानंतर या मॉडेल्सच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.4×4 फक्त फॉर्च्युनर आणि द लीजेंडच्या डिझेल प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या एसयूव्हीच्या 4×4 सिस्टीमसह २.८-लिटर डिझेल मॅन्युअल व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत ३८.९३ लाख रुपयांपासून सुरू होते. तसेच ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत ही ४१.२२ लाख इतकी आहे.
फॉर्च्युनर ४×४ आणि लीजेंड ४×४ मधून 11-स्पीकर JBL साउंड सिस्टीम का बंद करण्यात आली याचे कारण कंपनीने उघड केलेले नाही. उत्पादन खर्च वाढल्यामुळे कंपन्या आपल्या वाहनांच्या किंमतीमध्ये वाढ करत आहेत.