कोमाकीने भारतात आपली आलिशान इलेक्ट्रिक क्रूझर मोटरसायकल आणि व्हेनिस इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. कोमाकीच्या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत १ लाख १५ हजार रुपये आहे. कंपनीने व्हेनिस इलेक्ट्रिक स्कूटरला रेट्रो स्टाइलिंग दिली आहे. व्हेनिस इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीने अशी अनेक वैशिष्ट्ये दिली आहेत जी इतर कोणत्याही इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये उपलब्ध नाहीत. चला तर जाणून घेऊयात कोमाकीच्या व्हेनिस इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल…

व्हेनिस इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ब्लूटूथ आणि म्युझिक सिस्टीम कनेक्टिव्हिटी, क्रूझ कंट्रोल, डबल फ्लॅश, रिव्हर्स मोड, पार्किंग मोड आणि स्पोर्ट्स मोड यांसारखी अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. यामध्ये ग्राहकांना सेल्फ डायग्नोसिस टेक्नॉलॉजी, अँटी थेफ्ट लॉक सिस्टीम आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग देखील देण्यात आलं आहे. कंपनीने व्हेनिस इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये २.९ किलोवॅट लिथियम-आयन बॅटरीचा पॅक दिला आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ३ किलोवॅट आर इलेक्ट्रिक मोटर आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये १२० किमीची रेंज देते. तसेच सुरक्षेसाठी या इलेक्ट्रिक स्कूटरला सीबीएस ड्युअल डिस्क ब्रेकिंग सिस्टम आणि उत्तम सस्पेंशन देण्यात आले आहे.

Realme P1 Realme P1 Pro martphones will be available for purchase with Bank offers discounts and more
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्ट; रिअलमीच्या ‘या’ बजेट फ्रेंडली फोनची आज पहिली विक्री, जाणून घ्या आकर्षक सवलती
Samsung launched on Friday a new variant of its popular budget F15 smartphone Here is all the details
२० हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा सेटअपचा स्मार्टफोन; बॅटरी लाईफ बघून म्हणाल ‘डील Done’
Job Opportunity Recruitment of Junior Engineer
नोकरीची संधी: ज्युनियर इंजिनीअरची भरती
world's first self-driven electric
एप्रिल फुल नव्हे, खरचं चालकाशिवाय धावतेय ही दुचाकी! भाविश अग्रवालने केली Ola Soloची घोषणा, पाहा Video

Maruti Suzuki: तिसऱ्या तिमाहित मारुतीच्या नफ्यात ४८ टक्क्यांची घट, सेमीकंडक्टरचा तुटवडा आणि महागाईचा फटका

कोमाकीची व्हेनिस इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीच्या डीलरशिपवर उपलब्ध आहे. जर तुम्हाला ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल तर तुम्हाला कोमाकीच्या जवळच्या एजन्सीला भेट द्यावी लागेल आणि तुम्ही तुमच्या पसंतीच्या रंगाची व्हेनिस इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता. कोमाकी व्हेनिस इलेक्ट्रिक स्कूटर व्हेस्पासारखी दिसते. मागील बाजूचा कोल लोगो देखील पियाजिओसारखाच आहे. याशिवाय इलेक्ट्रिक स्कूटरला गोल हेडलॅम्प, एलईडी टर्न इंडिकेटर लॅम्प, एलईडी टेललाइट, फ्रंट स्टोरेज, लेदरपासून बनवलेल्या स्प्लिट सीट्स देण्यात आल्या आहेत. यामुळे या स्कूटरला जुन्या स्कूटरचा लूक मिळतो. कोमाकी व्हेनिस नऊ रंगांमध्ये उपलब्ध आहे. ब्राइट ऑरेंज, प्युअर व्हाइट, प्युअर गोल्ड, स्टील ग्रे, जेट ब्लॅक, आयकॉनिक यलो आणि ग्रेनाइट रेड असे पर्याय आहेत.