फेब्रुवारी महिन्यात देशात प्रवासी वाहनांची तुफान विक्री झाली आहे. या यादीत हॅचबॅक कार्सचा नेहमीप्रमाणे दबदबा पाहायला मिळाला. देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप १० हॅचबॅक कार्स कार्सची यादी पाहिल्यास मारुती सुझुकीचा बाजारावरील वरचष्मा पाहायला मिळेल. कारण देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पहिल्या १० हॅचबॅक कार्सपैकी ६ कार्स या मारुती सुझुकीच्या आहेत. यात ह्युंदाईच्या दोन आणि टाटा-टोयोटाची प्रत्येकी एक कार आहे.

फेब्रुवारी २०२२ मधील हॅचबॅक कार्सच्या विक्रीचे आकडे पाहता मारुती बलेनो देशातली सर्वांची आवडती कार ठरली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात या कारच्या १८,५९२ युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात कंपनीने बलेनोच्या १२,५७० युनिट्सची विक्री केली होती. या कारच्या विक्रीत ४८ टक्के वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात ही कार यादीत चौथ्या नंबरवर होती. तर अल्टो कार पहिल्या नंबरवर होती. वॅगनआर दुसऱ्या आणि स्विफ्ट तिसऱ्या नंबरवर होती.

फेब्रुवारी महिन्यातील टॉप १० हॅचबॅक कार्सचा विचार केल्यास बलेनो ही कार पहिल्या नंबरवर आहे. तर १८,४१२ युनिट्सच्या विक्रीसह मारुती स्विफ्ट कार दुसऱ्या नंबरवर आहे. दोन कार्सच्या विक्रीत अवघ्या १८० युनिट्सचा फरक आहे. मारुती अल्टो ही कार १८,११४ युनिट्सच्या विक्रीसह तिसऱ्या नंबरवर आहे. या यादीत चौथा क्रमांक मारुती वॅगनआरने पटकावला आहे. कंपनीने गेल्या महिन्यात या कारच्या १६,८८९ युनिट्सची विक्री केली आहे. तर पाचवा क्रमांक ह्युंदाई ग्रँड आय १० या कारने पटकावला आहे. गेल्या महिन्यात कंपनीने या कारच्या ९,६३५ युनिट्सची विक्री केली आहे.

हे ही वाचा >> व्यसनमुक्ती केंद्रात रुग्णाला दीड तास मारहाण, मग प्रायव्हेट पार्ट पेटवले, आजारामुळे गेल्याचे सांगत अंत्यविधी उरकले, पण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप १० हॅचबॅक कार्स

मारुती बलेनो : १८,५९२ युनिट्स
मारुती स्विफ्ट : १८,४१२ युनिट्स
मारुती अल्टो : १८,११२ युनिट्स
मारुती वॅगनआर : १६,८८९ युनिट्स
ह्युंदाई ग्रँड आय १० : ९,६३५ युनिट्स
ह्युंदाई आय २० : ९,२८७ युनिट्स
टाटा टियागो : ७,४५७ युनिट्स
मारुती इग्निस : ४,७८९ युनिट्स
मारुती सेलेरियो : ४,४५८ युनिट्स
टोयोटा ग्लान्झा : ४,२२३ युनिट्स