भारतात सध्या सीएनजी गाड्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे कंपन्या या मागणीची पूर्तता करण्याच्या मागे लागल्या आहेत. मारुती सुझुकी कंपनी या बाबतीत आघाडीवर आहे. मारुती कंपनीकडे देशात सर्वात जास्त सीएनजी कार्स आहे. कंपनी आता आपला या सेगमेंटमधला पोर्टफोलिओ विस्तारण्याच्या तयाारीत असून ही भारतीय कंपनी आगामी काळात आणखी नवीन सीएनजी गाडी लाँच करण्याच्या तयारीत आहे.

आता कंपनी मारुती सुझुकी ब्रेझाचे सीएनजी प्रकार लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. पोर्टफोलिओमधील हे कंपनीचे ११ वे सीएनजी मॉडेल असेल. नवीन मारुती सुझुकी ब्रेझा सीएनजी पुढील महिन्याच्या सुरुवातीला भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. अधिकृत लाँच होण्याआधी, या सब-कॉम्पॅक्ट एसयून्हीच्या सीएनजी व्हेरियंटची माहिती ऑनलाइन लीक झाली आहे.

मारुती सुझुकीच्या अधिकृत वेबसाइटवरून लीक झालेल्या माहितीनुसार, फॅक्टरी-फिट केलेले सीएनजी किट ब्रेझाच्या सर्व ट्रिम स्तरांसह ऑफर केले जाईल, म्हणजे LXi, VXi, ZXi आणि ZXi+. तसेच, मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह सीएनजी मिळवणारी ही भारतातील पहिली मारुती कार असेल.

आणखी वाचा : ‘Honda’ची नवीन स्वस्त बाईक लवकरच होणार भारतीय बाजारपेठेत लाँच; कमी किमतीत मिळणार जबरदस्त मायलेज

कारचे इंजिन

ब्रेझाच्या पेट्रोल मॉडेलबद्दल बोलायचे झाले तर, ते सध्या १.५-लिटर नैसर्गिकरित्या-एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. हे इंजिन XL6 आणि Ertiga मध्ये देखील दिसत आहे. हे इंजिन १०१ बीएचपीची कमाल पॉवर आणि १३६.८ एनएम पीक टॉर्क जनरेट करू शकते. इंजिन ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि पॅडल शिफ्टर्ससह ६-स्पीड टॉर्क-कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

मायलेज आणि वैशिष्ट्ये

ब्रेझाच्या फक्त पेट्रोल प्रकाराला २०.१५ kmpl पर्यंत मायलेज देण्यासाठी रेट केले आहे. या कारच्या इंटीरियर आणि फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास नवीन मॉडेलमध्ये सध्याच्या मॉडेलपेक्षा अधिक चांगलं इंटीरियर आणि फीचर्स मिळतील. या कारमध्ये एक नवीन डॅशबोर्ड, अँड्रॉयड ऑटो आणि अॅपल कारप्ले सपोर्टसह अपडेटेड ९ इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम दिली जाईल. तसेच या कारमध्ये नवीन SmartPlay Pro Plus इंटरफेस मिळेल. या कारमध्ये फॅक्टरी फिटेड सनरूफ, ३६० डिग्री कॅमेरा, वायरलेस फोन चार्जिंग, हेड-अप डिस्प्ले, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, फ्लॅट बॉटम स्टीयरिंग व्हील तसेच ६ एअरबॅग्ज, हिल डिसेंट असिस्ट यासह अनेक स्टँडर्ड फीचर्स मिळतील.

डिझाइन

Brezza CNG मॉडेलच्या डिझाइनमध्ये फारसा बदल होणार नाही, कारण ही कॉम्पॅक्ट एसयून्ही या वर्षीच अनेक अपडेट्ससह सादर करण्यात आली आहे. नवीन Brezza ला अनेक प्रमुख कॉस्मेटिक अपडेट्स मिळाले आहेत तर एसयूव्हीने बॉक्सी सिल्हूट आणि मस्क्यूलर अपील कायम ठेवले आहे. याला क्रोम अॅक्सेंटसह पुन्हा डिझाइन केलेली ग्रिल मिळते जी ट्विन सी-आकाराच्या एलईडी डीआरएलसह सर्व-एलईडी हेडलॅम्पने वेढलेली आहे.